Thu, Jul 18, 2019 16:29होमपेज › Satara › सातारा : सुट्टीसाठी गावी आलेला जवान बेपत्ता

सातारा : सुट्टीसाठी गावी आलेला जवान बेपत्ता

Published On: Aug 02 2018 7:54AM | Last Updated: Aug 02 2018 7:54AMसातारा: प्रतिनिधी

सातारा मध्यवर्ती बसस्थानकातून सचिन मानाजी पवार (वय 32, मूळ रा. वाठार कि. ता. कोरेगाव) हे दि. 29 जुलै रोजी बेपत्ता झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे ते भारतीय सैन्य दलात कार्यरत असून सध्या काश्मीर येथे त्यांची पोस्टिंग आहे. सुट्टीसाठी  गावी आल्यानंतर ही घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जवान सचिन पवार हे दि. 23 जुलै रोजी पाच दिवसांच्या सुट्टीसाठी सातारा येथील त्यांच्या मूळ गावी आले होते. पाच दिवसांची सुट्टी झाल्यानंतर पुणे येथे कोर्ससाठी त्यांना जायचे होते. वाठार किरोली येथून त्यांचे भाऊ महेश पवार हे सोडण्यासाठी सातारा स्टँडमध्ये आले होते. गाडी पार्क करेपर्यंत जवान सचिन पवार तेथून गेले. मात्र ते पुणे येथे पोहचले नसल्याचे समोर आल्याने कुटुंबियांनी सर्वत्र शोध घेतला. जवान सचिन कुठेही सापडले नसल्याने अखेर सातारा शहर पोलीस ठाण्यात ते बेपत्ता झाले असल्याची तक्रार भाऊ महेश पवार यांनी दिली आहे.