Thu, Jan 17, 2019 02:52होमपेज › Satara › जेसीबी चोरटेे जेरबंद 

जेसीबी चोरटेे जेरबंद 

Published On: Feb 07 2018 1:35AM | Last Updated: Feb 06 2018 10:00PMवेणेगाव : वार्ताहर 

निनाम (पाडळी), ता. सातारा येथे दोन महिन्यांपूर्वी 4 लाख रूपये किमतीचा जेसीबी चोरीस गेला होता. हा जेसीबी कर्नाटक राज्यातून हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी  बोरगाव पोलिसांनी जगदीश गोपू चव्हाण  (वय 22 ) मूळ रा. मुसाळेतांडा (कर्नाटक) सध्या कडेगाव, जि. सांगली आणि सुनील व्यंकु  राठोड  (वय 25 ) मूळ रा. मकनापूर ता.जि.विजापूर दोन संशयितांना अटक केली आहे. 

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, दोन महिन्यांपूर्वी डोळेगाव येथील सर्जेराव कृष्णा गोडसे यांच्या मालकीच्या शेतातून चार लाख रुपये किमतीचा जेसीबी चोरीस गेला होता. याबाबतची तक्रार सुनील शामराव जाधव रा. निनाम (पाडळी ) ता. सातारा यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात दिली होती. या जेसीबीवर ऑपरेटर म्हणून सुनील राठोड काम पाहत होता. या तक्रारीवरून सपोनि संतोष चौधरी व डीबी शाखेचे कर्मचारी शशिकांत फडतरे, किरण निकम, राजू शिखरे यांनी दोन दिवसांपूर्वी सुनील राठोड याचा दाजी जगदीश चव्हाण याला कडेगाव येथून अटक केली. त्याच्याकडे चौकशी केली असता जगदीश याने सुनीलचा थांगपत्ता सांगितला. त्यानंतर पोलिसांनी कोतबाळ येथून सुनील याला अटक केली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल डाटावरून तपास केला असता जगदीश याने हा जेसीबी चोरी केला व सुनील याने त्याला मदत केल्याचे निष्पन्‍न झाले. पोलिसांनी जेसीबी जप्‍त केला असून दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तपास सहाय्यक फौजदार शशिकांत फडतरे करत आहेत.