Tue, Jul 23, 2019 04:49होमपेज › Satara › यू डायस’ विरहीत शाळा आढळल्यास कारवाई

यू डायस’ विरहीत शाळा आढळल्यास कारवाई

Published On: Dec 02 2017 12:36AM | Last Updated: Dec 01 2017 8:42PM

बुकमार्क करा

सातारा: प्रतिनिधी

सातारा जिल्ह्यातील शाळांमधील प्रत्येक मूल यू डायस प्रणालीमध्ये नोंदणी होण्याकरता शाळांना यू डायस क्रमांक ऑनलाईन पध्दतीने प्राप्त करणे बंधनकारक करण्यात आले आहे. परंतु, शिक्षक आणि संस्थाचालकांनी या आदेशाकडे पाठ फिरवल्याने संबंधितावर कारवाईची तंबी देताना यू डायस विरहीत शाळा आढळल्यास संस्थाचालकांवरच  कारवाई करण्याचा इशारा प्राथमिक शिक्षण परिषदेने दिला आहे.

राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने प्रत्येक शाळेला यू डायस  क्रमांक देण्याचे धोरण हाती घेतले आहे. त्यासाठी शिक्षण परिषदेने याबाबत वेळोवेळी सूचनाही केल्या होत्या. सहा महिन्यापूर्वी आदेश काढूनही गेल्या आठवड्यापर्यंत 2254 शाळांनी नोंदणी केली.त्यापैकी 836 शाळांना अद्यापपर्यंत यू डायस क्रमांकाला जिल्हा, तालुकास्तरावरून मान्यता व  मंजुरी  देण्यात आलेली नाही. याबाबत संबंधितांना यू डायस क्रमांक  देण्याकरता सूचना देवून  त्या शाळांची माहिती सरल  व यू डायस सन 2017 व 18 प्रणालीमध्ये भरून घेण्यात यावी.

राज्यातील  एकही  मूल शाळा विरहीत राहणार नाही यासाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने  प्रत्येक शाळेस यू डायस क्रमांक देण्याबाबतची कार्यवाही सुरू केली आहे. यासाठी  विविध संस्था व शाळांना वारंवार  आदेश देवूनही यू डायस क्रमांक घेण्यासाठी शाळा आणि संबंधित संस्था  टाळाटाळ करत असल्याने शिक्षण परिषदेने कारवाईचा निर्णय घेतला आहे. 

परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक नंदकुमार यांनी यू डायस  क्रमांक आणि सरल जोडणीत हलगर्जीपणा  करणार्‍या संबंधितांवर प्रशासकीय कारवाई करावी, असे आदेशही दिले आहेत. शिक्षण संस्था प्रमुख आणि शाळांनाही यामध्ये जबाबदार धरून यू डायस विरहित शाळा आढळल्यास  त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे  आदेश शिक्षण अधिकार्‍यांना दिले आहेत.