Fri, Jun 05, 2020 12:23होमपेज › Satara › मसूरमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात

मसूरमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात

Published On: Jun 21 2019 11:35AM | Last Updated: Jun 21 2019 12:48PM

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगाभ्यास करताना मसूर येथील सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूलमधील विद्यार्थीमसूर - पुढारी ऑनलाईन

कराड तालुक्यातील मसूरमध्ये आज आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. येथील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी योगदिन साजरा केला. यावेळी मैदानावर योगाभ्यास करण्यात आला. योगाचे महत्व यानिमित्ताने विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. येथील जिल्हापरिषद प्राथमिक  शाळा, श्री शिवाजी विद्यालय, कन्या प्रशाला, सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूल, जिल्हापरिषद शाळा वाघेश्वर येथे विविध उपक्रमांच्या माध्यमातून योगदिन साजरा करण्यात आला. 

भारतीय योगाचे महत्व जगाने जाणले आहे. मात्र त्याचा मोठ्या प्रमाणावर प्रचार आणि प्रसार झाला  नव्हता. आता आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या माध्यमातून जगभरामध्ये योगाबद्दल जागृती निर्माण होत आहे. जगभरात योग दिन साजरा करण्यात येत असल्याने त्याची महती जगाला आता मोठ्या प्रमाणात कळू लागली आहे. देशातही शालेय स्तरावर मोठ्या प्रमाणात योगदिवस साजरा करण्यात येत असल्याने त्याचे महत्व आता मुलांनाही कळत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मुले योगाभ्यासाकडे वळत आहेत. तंदुरुस्त भारत देशासाठी योग महत्वाचा आहे. त्याची यानिमित्ताने गोडी लागेल यात शंकाच नाही.