Wed, Nov 21, 2018 19:47होमपेज › Satara › पालिकेच्या कंपोस्ट प्रकल्पाची केंद्रीय पथकाकडून पाहणी

पालिकेच्या कंपोस्ट प्रकल्पाची केंद्रीय पथकाकडून पाहणी

Published On: Jun 23 2018 1:23AM | Last Updated: Jun 22 2018 8:26PMकराड : प्रतिनिधी

कराड नगरपरिषदेच्या स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये भाग घेऊन घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत विविध उपक्रम घेतलेले आहेत. या विविध प्रकल्पाची नुकतीच केंद्रीय पथकाकडून पाहणी करण्यात आली. 

या पथकामध्ये स्वच्छ भारत मिशन नॅशनल युनिट शहरी व गृहनिर्माण कार्यालय, केंद्रीय मंत्रालय, पथक प्रमुख हॉस्टीना मोमेल्स तसेच स्वच्छ भारत मिशन तांत्रिक तज्ज्ञ  अभिजीत आवारी यांनी नुकतीच भेट दिली. यावेळी पथकाने हरित कंपोस्ट कसे तयार होते, कंपोस्टचे विपनन व विक्री कशी होते, हरीत ब्रॅन्ड मिळण्यापूर्वी विक्रीमध्ये किती फरक पडला आहे याची पाहणी केली व अभ्यास दौरा केला.

पथकाने नगरपरिषदेचे ऑक्सिडेशन पॉन्ड येथील कंपोस्ट डेपो प्रकल्प, शिवाजी हौसिंग सोसायटीमधील चंद्रकांत जाधव यांचा घरगुती खत प्रकल्प, सागर जाधव यांचा घरगुती बायोगॅस प्रकल्प, डॉ. देशपांडे यांचा खत प्रकल्प आदींना भेट देऊन माहिती घेतली व समाधान व्यक्‍त केले. यावेळी मुख्याधिकारी यशवंत डांगे, उपअभियंता ए. आर. पवार, आर. डी. भालदार, रोहित आतवाडकर उपस्थित होते.