Tue, Jul 07, 2020 07:51होमपेज › Satara › ‘कस्तुरी क्लब’तर्फे आज ‘नाच गं घुमा’

‘कस्तुरी क्लब’तर्फे आज ‘नाच गं घुमा’

Published On: Sep 10 2019 1:20AM | Last Updated: Sep 09 2019 9:58PM
सातारा : प्रतिनिधी

दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लबतर्फे नेहमीच महिलांसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात. त्याच अनुषंगाने कस्तुरी क्लब आणि मंडईचा राजा गणेशेात्सव मंडळातर्फे यंदा सर्व महिलांसाठी गौरी-गणपती सणाचे औचित्य साधून ‘नाच गं घुमा..’ या पारंपरिक खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमादरम्यान महिलांचे सामूहिक अथर्वशीर्ष पठणही होणार आहे.

‘नाच गं घुमा’ हा कार्यक्रम मंगळवार दि. 10 सप्टेंबर रोजी मंडईचा राजा गणेशेात्सव मंडळ, जुनी भाजी मंडई, सदाशिव पेठ सातारा येथे  दुपारी 3 ते 6  या वेळेत होणार आहे. पूर्वीच्या काळात  ‘नाच गं घुमा, काठवट कणा, घागर घुमवणे, सूप नाचवणे, असे पारंपारिक खेळ खेळून रात्र जागवली जायची. मात्र, काळानुसार बदल होत गेला आणि असे पारंपारिक खेळ महिला विसरत गेल्या. हेच खेळ पुन्हा ‘पुढारी’ कस्तुरी क्लबच्या माध्यमातून पहायला मिळणार आहेत, या  खेळांच्या माध्यमातून संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला जात आहे. ‘नाच गं घुमा’ कार्यक्रमात बेलेश्वर ग्रूप सैदापूर यांच्यातर्फे पारंपारिक खेळ सादर केले जाणार आहेत.

सर्व महिला या खेळांमध्ये सहभागी होऊ शकतात, तसेच या कार्यक्रमादरम्यान पारंपारिक खेळ सादर केले जाणार आहेत. हे खेळ सर्व महिलांना पाहण्यासाठी खुले आहेत. उपस्थित सर्व महिलांना मंडईचा राजा गणेशेात्सव मंडळातर्फे आर्कषक भेटवस्तू दिली जाणार आहे. जास्तीत जास्त महिलांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून या खेळाचा आनंद घ्यावा, असे आवाहन ‘पुढारी’ कस्तुरी क्लबतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी रूपेश (9762527109) यांच्याशी संपर्क साधावा.