Wed, Jul 17, 2019 12:48होमपेज › Satara › फडणवीस सरकारकडून पश्‍चिम महाराष्ट्रावर अन्याय : पृथ्वीराज चव्हाण

फडणवीस सरकारकडून पश्‍चिम महाराष्ट्रावर अन्याय : पृथ्वीराज चव्हाण

Published On: Apr 29 2018 2:07AM | Last Updated: Apr 28 2018 8:45PMकराड : प्रतिनिधी

राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने पश्‍चिम महाराष्ट्रावर सातत्याने अन्याय केला आहे. सरकार आकसापोटी विकासकामाला खो घालत आहे. अशी टिका माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. दरम्यान, येणार्‍या निवडणूकीत जातीयवादी भाजप सरकार उलथवून टाकण्याचे आवाहनही त्यांनी केले. 

विंग (ता. कराड) येथील संपर्क बैठकीत ते बोलत होते. कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती सुनिल पाटील, जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खबाले, निवासराव थोरात, शिवाजी पाटील, सुभाषराव पाटील, सरपंच धनाजीराव पाटील, निवासराव शिंदे, विठ्ठल राऊत, अनिल माळी, आबासाहेब खबाले यांची प्रमुख उपस्थिती होती. 

आ. चव्हाण म्हणाले, भाजप सरकार सत्तेत येवून तीन वर्षे झाली. त्यांच्याकडून केवळ खोट्या आश्‍वासनांची खैरात सुरू आहे. चुकीची अणि आडमूठी धोरणे सरकार राबवत आहे. त्यातून सर्वसामान्य जनतेला वेठीस धरत आहेत. सरंक्षणासाठी लागणार्‍या विमान खरेदीत सरकारने घोटाळा केला आहे. पाचशे तीस कोटींची विमाने पंधराशे कोटीला खरेदी केली आहेत. दोन वर्षात एवढी तफावत कशी? याची माहिती मागवली तरी ती माहिती मिळत नाही. अशा सरकारवर विश्‍वास ठेवायचा का असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला. 

यावेळी विविध गावचे सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते. शंकरराव खबाले यांनी स्वागत केले. अधिकराव गरूड यांनी आभार मानले. यावेळी विविध संस्थांचे पदाधिकारी व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.