होमपेज › Satara › परदेशात करिअरच्या वाढत्या संधी : प्रा. हर्षद ठाकूर

परदेशात करिअरच्या वाढत्या संधी : प्रा. हर्षद ठाकूर

Published On: Jun 11 2018 1:08AM | Last Updated: Jun 10 2018 10:41PMसातारा : प्रतिनिधी

सध्याचे विद्यार्थी सायन्स, बीएससी, इंजिनिअर क्षेत्र निवडत आहेत. पण त्यात सखोल ज्ञान आणि प्रत्यक्ष ज्ञान असणे गरजेचे आहे. हे ज्ञान असेल तरच परदेशात करिअर करू शकता. करिअरला परदेशात खूप संधी आहे, असे मत इनव्हीक्टस नॉलेज सोल्युशन प्रा. लि.चे प्रा. हर्षद ठाकूर यांनी व्यक्त केले.

संजय घोडावत युनिव्हर्सिटी प्रेझेंट ‘पुढारी एज्यु दिशा 2018’ पॉवर्ड बाय पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट, नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळ पुणे, असोसिएट स्पॉन्सर विश्‍वकर्मा इन्स्टिट्यूट पुणे, को- स्पॉन्सर्स चाटे ग्रुप शिक्षण समूह, मराठवाडा मित्र मंडळ, सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित ‘पुढारी एज्यु दिशा 2018’ प्रदर्शनात ‘विदेशातील करिअरच्या संधी’ या विषयावर ते बोलत होते.

प्रा. ठाकूर म्हणाले, सद्य स्थितीत इंजिनिअरिंग, बायोटेक्नॉलॉजी, आटोमोबाईल, सायन्स, बीएससी या क्षेत्रातून करिअर करायचे असेल तर परदेशात जाऊन करिअर करण्याची संधी उपलब्ध आहे. जगातील सर्वोत्तम इंजिनिअर हा भारतातील असून गणितामुळे भारतीय इंजिनिअर म्हणून ओळख निर्माण झाली आहे.  परदेशात फक्त अभ्यास करून घडलेले विद्यार्थी म्हणजे ‘ढ’ विद्यार्थी मानतात. पण जो कृतीही करतो आणि अभ्यासही करतो त्याला परदेशात नक्की करिअर करता येते. सध्या अमेरिका, कॅनडा, जर्मनी, दुबई, चीन, ऑस्ट्रेलिया आदी ठिकाणी इंजिनिअरिंग, आटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक या क्षेत्रातील लोकांना करिअर करण्याची संधी उपलब्ध आहेत. 

याबरोबरच भाषा ज्ञान, गायन क्षेत्र, योग ज्ञान या क्षेत्रातही करिअर करण्याची संधी उपलब्ध होत आहे. ज्या देशात जाण्यासाठी तुम्ही तयार आहात त्याठिकाणची भाषा येणे गरजेचे असल्याचे ठाकूर यांनी सांगितले.