Thu, Jul 18, 2019 17:17होमपेज › Satara › धरणांचा सिंचन योजनेत समावेश

धरणांचा सिंचन योजनेत समावेश

Published On: Dec 16 2017 1:49AM | Last Updated: Dec 15 2017 10:41PM

बुकमार्क करा

सणबुर : वार्ताहर

सातारा जिल्ह्यात एकूण पाच मध्यम धरण प्रकल्पांचा समावेश प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेत झाला असून त्यातील तीन धरण प्रकल्प हे पाटण तालुक्यातील आहेत. सन 2017-18 करीता या तिन्ही धरण प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांची मागणी असणारी कामे पुर्ण करणेकरीता 161.50 कोटी रुपयांची तरतूद शासनाने केली असल्याची  माहिती आ. शंभूराज देसाई यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
कृष्णा खोरे विकास महामंडळातंर्गत युती शासनाच्या काळात सुरु झालेल्या पाटण तालुक्यातील वांग मराठवाडी व तारळी धरण प्रकल्प तसेच मोरणा गुरेघर असे तीन मध्यम धरण प्रकल्प या प्रकल्पांच्या माध्यमातून पाटण तालुक्यातील ठरवून दिलेले जमिन क्षेत्र लवकरच ओलिताखाली येणेकरीता या प्रकल्पांचा समावेश केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेत व्हावा याकरीता सातत्याने आ. शंभूराज देसाई यांचा  राज्य व केंद्र शासनाकडे पाठपुरावा सुरु होता. या पाठपुराव्यास यश मिळाले आहे. 

पत्रकात म्हटले आहे की, धरण प्रकल्पांला 1980 मध्ये केवळ 6.26 कोटी रुपयांची तरतूद केली होती त्यामध्ये वाढ करुन 1993-94 ला 36.16 कोटी एवढा निधी देवून प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली.त्यानंतर या प्रकल्पावर आजअखेर 122.33 कोटी रुपये इतका अद्यावत खर्च करण्यात आला आहे. 

मोरणा गुरेघर तसेच तारळी धरणाचे काम पुर्ण झाले असून या दोन्ही धरणाच्या माध्यमातून धरण बांधकाम करताना या विभागातील ठरवून दिलेले जमिन क्षेत्र ओलिताखाली येणेकरीता आवश्यक असणारा निधी उपलब्ध होणेकरीता हे प्रकल्प प्रधानमंत्री कृषि सिचंन योजनेत समाविष्ट होणे अत्यंत गरजेचे होते.तर वांग मराठवाडी या धरणप्रकल्पाचे पुनर्वसनाचे अनेक प्रश्‍न प्रलंबीत असल्याने या प्रकल्पाचे काम रखडले होते. लवकरच या धरण प्रकलपातील पुर्नवसनाचे प्रश्‍न मार्गी लागतील.

या प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता युतीच्या शासनाने दिली असून सन 2017-18 करीता 50 कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे. या निधीतून पुनर्वसन, पुनर्वसित गांवातील नागरी सुविधांची कांमे व धरणाचे मातीकाम पुर्ण करण्याचे नियोजन आहे.यामध्ये 62 प्रकल्पग्रस्तांना तडसर जि.सांगली येथे पुनर्वसनाकरीता जमिन मिळवून देणे व 161 खातेदारांनी प्रकल्पाच्या वरसरकून गावठाण मिळणेबाबत केलेल्या मागणीनुसार त्यांना गावठाण वसवून देणे या कामांचा समावेश आहे. तारळी धरणाचे काम पुर्णत्वाकडे गेले असून या प्रकल्पातील पाणी प्राधान्याने या विभागातील 50 मीटर उंचीवरील जमीन क्षेत्राकरीता देणेची आमची मागणी होती याचा विचार करुन मान्यता प्राप्त झालेल्या उपसा सिंचन योजनांचे 50 मीटर उंचीवरील क्षेत्रास पाणी देणेच्या कामांचा अंतर्भाव सुधारित प्रशासकीय मान्यतेमध्ये करुन पुनश्‍च: प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या त्यानुसार प्रस्ताव मान्यतेकरीता शासनास सादर करण्यात आला आहे. 

तारळी धरणातील पाणी 50 मी.उंचीवरील जमीन क्षेत्रास पाणी मिळवून देणे हे आपले उद्दिष्ट होते. सातत्याच्या पाठपुराव्यामुळे राज्याचे जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन यांनी या कामांसंदर्भात फेरसर्व्हे करुन अहवाल सादर करण्याच्या सुचना महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांना दिल्या असून नुकताच याचा फेरसर्व्हे पुर्ण झाला आहे, असे पत्रकात म्हटले आहे.