Mon, Jul 15, 2019 23:40होमपेज › Satara › सवंग प्रसिध्दीसाठी सरकारकडून फसव्या घोषणा : आ. बाळासाहेब पाटील

सवंग प्रसिध्दीसाठी सरकारकडून फसव्या घोषणा : आ. बाळासाहेब पाटील

Published On: Feb 24 2018 1:13AM | Last Updated: Feb 23 2018 11:32PMकराड : प्रतिनिधी

सध्या केंद्र व राज्य सरकार सवंग लोकप्रियतेसाठी अनेक फसव्या घोषणा करून लोकांची दिशाभूल करत आहे. प्रत्येक गोष्टीत जनतेस वेठीस धरले जात आहे, असे प्रतिपादन आ. बाळासाहेब पाटील यांनी मरळी (चोेरे) ता.कराड येथील विविध विकास कामांच्या भुमिपूजन आणि उद्घाटन प्रसंगी केले.

मरळी (चोरे) ता.कराड येथे आ. पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने डोंगरी विकास निधीमधून अंगणवाडी इमारतीचे भुमिपूजन आणि जोतिबा मंदिरासमोरील सभामंडपाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी पं.स.सदस्य देवराजदादा पाटील, जि.प.सदस्या सौ.सुरेखा जाधव, सोमनाथ जाधव, मानसिंगराव मोहिते, संजय कदम, जयवंतराव साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

आ.पाटील म्हणाले, विकास ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असून त्यासाठी गावाने आपआपसामधील मतभेद बाजूला ठेवून एकसंघ राहणे आवश्यक आहे, या गावाने नेहमी स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेब, पी.डी.पाटीलसाहेब यांच्या विचारांना पाठबळ दिले आहे.सह्याद्रि कारखान्याच्या माध्यमातून पाणंद रस्त्याची सुधारणा करण्यात आली. सध्याचे सरकार हे पश्‍चिम महाराष्ट्रातील विकासाविरोधी आहे, हे आता जनतेच्या लक्षात आले आहे. कर्जमाफी योजनेला शिवाजी महाराजांचे नाव देवून जाचक अटीतून लाभ न देण्याचा कुटील डाव हे सरकार करीत आहे.  कृषीपंप धारकांना वीज कनेक्शन दिली जात नाहीत.

देवराज पाटील म्हणाले, पाल व इंदोली उपसासिंचन योजना मार्गी लावण्यासाठी शासनाकडे मागणी केली. परंतु 50 मीटर उंचीमध्ये हा परिसर बागायत होवू शकत नाही. यासाठी 100 मीटर उंचीपर्यंत पाणी पोहचणे गरजेचे आहे.  सूत्रसंचालन शंकर कुंभार यांनी व प्रास्ताविक भास्कर कुंभार यांनी केले. आभार राजेंद्र नांगरे यांनी मानले. 

कार्यक्रमास सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे संचालक भास्करराव गोरे, पै.संजय थोरात, डी.बी.जाधव, संजय जगदाळे, माजी संचालक संजय कदम, सरपंच पांडुरंग सावंत, उपसरपंच सौ.तारूबाई सुतार, माजी सरपंच बाळासाो कुंभार, भास्कर कुंभार, शंकर कुंभार, दीपक पडवळ, प्रकाश पिसाळ  यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.