Sat, Mar 23, 2019 02:12होमपेज › Satara › डल्ला मारणारे हल्लाबोल करत आहेत : शंभूराज देसाई 

डल्ला मारणारे हल्लाबोल करत आहेत : शंभूराज देसाई 

Published On: Apr 24 2018 1:07AM | Last Updated: Apr 23 2018 10:49PMसणबुर : वार्ताहर

राष्ट्रवादीचा हल्लाबोल पाटणला झाला. ज्यांनी सत्तर हजार कोटींवर डल्ला मारला तेच आता हल्लाबोल करीत आहेत. राष्ट्रवादीच्या मातब्बरांनी केलेली टिका पाटण मतदारसंघातील मतदारांच्या जिव्हारी लागली असून निष्क्रीय पाटणकर पितापूत्र जेवढे मातब्बर माझे विरोधात पाटण तालुक्यात मतदारांचा बुध्दीभेद करायला आणतील त्याच पटीने मतदारसंघातील मतदार माझे मताधिक्कयात वाढ करतील, असा विश्‍वास आ. शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला.  

मल्हारपेठ ता.पाटण येथे पशुवैद्यकीय दवाखान्याचे उद्घाटन व नंदीवाले समाजाकरीता डोंगरी विकास निधीमधून देण्यात आलेल्या सभामंडपाचे भूमिपुजन अशा संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील, शिवदौलत बँकेचे चेअरमन मिलिंद पाटील, जिल्हा परिषद सदस्य विजय पवार, पंचायत समिती सदस्य सुरेश पानस्कर, सदस्या सौ.सुभद्रा शिरवाडकर, प्रा.विश्‍वनाथ पानस्कर, मानसिंगराव नलवडे, मल्हारपेठ सरपंच गौरीहर दशवंत, मानसिंग कदम, उपसरंपच सुर्यकांत पानस्कर यांची उपस्थिती होती.

आ. देसाई म्हणाले,  हल्लाबोल मोर्चात सत्यजितसिंह पाटणकरांना मी मंजूर करुन आणलेल्या विकास कामांचे आकडे दिसतायत पण कामे कुठे दिसत नाहीत. पाटणकरसाहेब वाडयाच्या पायर्‍या उतरुन पाटण तालुक्यातील डोंगर कपारीतील वाडीवस्तीवर जावा, तिथे तुम्हाला मी मंजूर केलेल्या रस्त्यांच्या डांबरीकरणाची कामे दिसतील. एका वर्षात पाटण मतदारसंघात एकावेळी 53 नळ पाणी पुरवठा योजनांची कांमे मंजूर करुन आणलेली दिसतील. आपले पिताश्री पाटणकर दादा मंत्री असताना त्यांना पाटण तालुक्यात 53 नळ पाणी पुरवठा योजनांची कामे एकाचवेळी मंजूर करता आली होती का? कराड ते नवारस्ता आणि उंब्रज ते निसरे फाटा असा रस्ता केला. त्या रस्त्यावर दोन ठिकाणी टोल बसविण्याचे काम केले.

नावाप्रमाणे तरी रामराजेंनी निधी द्यायचा?

मल्हारपेठच्या दिंडूकलेवाडी येथील रस्त्याला म्हणे विधानपरिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी साडेचार लाख रुपयांचा निधी दिला आहे.  आपले नाव एवढे मोठे, या नावाला शोभेल येवढा तरी निधी द्यायचा. येवढ्या पैशात रस्त्याचे खडीकरण होणार नाही. गावाच्या तोडांला पाने पुसण्याचा हा प्रकार असल्याचे आ. देसाई म्हणाले.