Sat, Jul 20, 2019 23:25होमपेज › Satara › पोलिस पाल्यांसाठीचा उपक्रम अत्यंत स्तुत्य

पोलिस पाल्यांसाठीचा उपक्रम अत्यंत स्तुत्य

Published On: Apr 26 2018 2:04AM | Last Updated: Apr 25 2018 10:28PMसातारा : प्रतिनिधी

उत्कृष्ट शिक्षण ही काळाची गरज असून सातारा पोलिसांच्या पाल्यांना सेमी इंग्लिशचे शिक्षण मिळणार असल्याने त्याचा विशेष आनंद आहे. ‘शिक्षण म्हणजेच प्रगती’ हे सूत्र असून सातारा जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी पोलिस पब्लिक स्कूल, पोलिस पाल्यांसाठी सुरु केलेले पाळणाघर हे उपक्रम अत्यंत स्तुत्य असून जिल्ह्यातील स्मार्ट पोलिसिंगचे करावे तेवढे कौतूक थोडेच आहे,  असे गौरवोद‍्गार राज्याचे पोलिस महासंचालक सतीश माथूर यांनी काढले. दरम्यान, मुलांनी केलेल्या ‘वेलकम’ने डीजी भारावून गेले. 

सातारा जिल्हा पोलिस दलाच्यावतीने यावर्षी सुरू झालेल्या ‘पोलिस पब्लिक स्कूल, पोलिसांच्या पाल्यांसाठी पाळणाघर’ या उपक्रमाचे बुधवारी दुपारी पोलिस महासंचालक सतीश माथूर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. तसेच स्मार्ट पोलीस अंतर्गत मिळालेल्या प्रमाणपत्राचे येथील अलंकार हॉलमध्ये वितरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील, पोलिस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक विजय पवार व कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे सुरेश भोसले उपस्थित होेते.सतीश माथूर यांनी शाळेतील चिमूरड्या मुलांशी संवाद साधला. सर्वांना बोलते करत हाय, हॅल्‍लो  करताच मुलेही भारावून गेली व त्यांनी त्यांचे उस्फूर्त स्वागत केले. शाळेची इमारत, त्यातील विभाग याची पाहणी केली. त्यानंतर पोलिस मुख्यालयापाठीमागे महिला पोलिसांच्या पाल्यांसाठी यंदाच्या वर्षापासून पाळणाघर सुरु करण्यात आले असून त्याचेही उद्घाटन केले. याठिकाणीही महिला पोलिस व मुलांशी त्यांनी बातचीत केली.

नुतनीकरण केलेल्या अलंकार हॉललाही त्यांनी भेट दिली. सातारा जिल्हा पोलिस दल महाराष्ट्रात स्मार्ट पोलिसिंगमध्ये अव्वल ठरले असून त्याच्या प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम याठिकाणी घेण्यात आला. डीजी माथूर यांच्या हस्ते जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांतील पोलिस अधिकार्‍यांना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. दरम्यान, यावेळी शाळेबाबतची पोलिस दलाची संकल्पना, त्यासाठी सर्वांनी केलेल्या सहकार्याची माहिती, शाळेचे पॉवर प्रेझेंटेशन दाखवण्यात आले. सूत्रसंचालन पोलिस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर, पोलिस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी केले.कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील पोलिस अधिकारी, पालक, पोलिस मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Tags : satara, satara news, police, Police Public School, Inauguration,