होमपेज › Satara › अर्थ समितीच्या सभेत कॅफो धारेवर

अर्थ समितीच्या सभेत कॅफो धारेवर

Published On: May 04 2018 1:49AM | Last Updated: May 03 2018 11:07PMसातारा : प्रतिनिधी

सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी  नवीन शैक्षणिक वर्षापासून प्रत्येक शिक्षण समिती सदस्यांनी शाळा दत्तक घेण्यासंदर्भाचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, अर्थ समितीच्या सभेत सदस्यांनी कॅफोना ऑनलाईन कामकाजावरून चांगलेच धारेवर धरले.शिक्षण सभापती राजेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण व क्रीडा  समितीची बैठक संपन्न झाली. सभेस अरूण गोरे, शिवाजी चव्हाण, प्रदिप पाटील, मंगेश धुमाळ, सौ. रूपाली राजपुरे, विजय पवार, नवनाथ भरगुडे, शंकर देवरे, रूपेश जाधव, प्राथमिक शिक्षणाधिकारी  पुनिता गुरव, माध्यमिक शिक्षणाधिकारी देविदास कुलाळ उपस्थित होते.

समितीच्या सदस्यांबरोबर सर्वच्या सर्व 11 तालुक्यातील पंचायत समित्यांच्या गटशिक्षणाधिकार्‍यांनी दोन शाळा दत्तक घेवून त्या शाळा सुधारण्यासंदर्भात नियोजनाबाबत राजेश पवार यांनी सूचना दिल्या.प्रतापसिंह हायस्कूलच्या शैक्षणिक व प्रशासकीय कामकाजांचा आढावा घेण्यात आला. तसेच सन 2018 व 19 या शैक्षणिक वर्षामध्ये प्राथमिक शाळांना द्यावयाच्या सुट्ट्यांच्या यादीस मान्यता देण्यात आली.गटशिक्षणाधिकार्‍यांकडून प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र, शैक्षणिक गुणवत्ता, प्रशासकीय (शालेय पोषण आहार, सर्व शिक्षा अभियान) आदी कामकाजाचा आढावा घेण्यात आला.

दरम्यान, अर्थ समितीची सभा सभापती राजेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.सातारा जिल्हा परिषदेमधील सर्वच विभागांचे ऑनलाईन कामकाज करण्यासंदर्भात सॉफ्टवेअर लवकरात लवकर कार्यान्वित न केल्याने मुख्य लेखा व वित्त अधिकार्‍यांना सर्वच सदस्यांनी धारेवर धरले. सर्वच विभागातील कामकाज ऑनलाईन करण्यासंदर्भात मुख्य लेखा व वित्त अधिकार्‍यांसह अधिकार्‍यांना राजेश पवार यांनी सूचना दिल्या. तसेच नवीन प्रिटींग प्रेस कार्यान्वीत करण्यावरूनही सदस्य आक्रमक झाले. दरम्यान, प्रतापसिंह हायस्कूल येथील पटसंख्या व गुणवत्ता वाढीसंदर्भात शिक्षण सभापती राजेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील नगरपालिका शाळेमधील मुख्याध्यापकांची बैठक संपन्न झाली. बैठकीस प्राथमिक शिक्षणाधिकारी पुनिता गुरव, उपशिक्षणाधिकारी मुजावर व अधिकारी उपस्थित होते.बैठकीत  शाळेसंदर्भात कृती आराखडा तयारकरण्याबाबत सूचना देण्यात आल्या. गुणवत्ता वाढ व पटसंख्यावाढीबाबत चर्चा करण्यात आली.

Tags : Satara, meeting, Finance, Committee