Mon, Apr 22, 2019 01:48होमपेज › Satara › लाचप्रकरणी फलटणच्या तलाठ्याविरुध्द गुन्हा दाखल

लाचप्रकरणी फलटणच्या तलाठ्याविरुध्द गुन्हा दाखल

Published On: Feb 27 2018 1:56AM | Last Updated: Feb 26 2018 10:53PMफलटण : प्रतिनिधी

वाळू, मुरुम व माती वाहतूक व्यवसायाला मदत करतो, असे सांगून त्यासाठी 20 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी फलटण येथील तलाठी लक्ष्मण अहिवळे याच्याविरुध्द फलटण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, पुणे लाचलुचपत प्रतिबंध विभागाने याप्रकरणी तक्रार दिली असून 20 दिवसानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. 

याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदार यांना वाळू उपशासाठी मदत करतो, असे संशयित तलाठी लक्ष्मण अहिवळे याने सांगून 20 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदार यांनी पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंध विभागात दि. 5 रोजी याबाबतची तक्रार दिली. पुणे पोलिसांनी पडताळणी केली व लाचेची मागणी होत असल्याचे समोर आले. पैसे घेतले जात नसल्याने अखेर त्याप्रकरणी लाच मागितल्याची तक्रार सोमवारी दाखल झाली.

फलटण येथील तलाठ्यावर लाचप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची माहिती पसरताच फलटण येथील प्रशासकीय कार्यालयात खळबळ उडाली आहे. पुणे एसीबी कार्यालयाने ही कारवाई केल्यानंतर पुढील तपास सातारा एसीबी करणार आहे. दरम्यान, सातारा शहरासह जिल्ह्यात लाचेची मागणी झाल्यास 1064 या टोल फ्री क्रमाकांवर व सातारा लाचलुचपत प्रतिबंध विभागात तक्रार द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.