Wed, Jul 17, 2019 18:06होमपेज › Satara › सातारा-पंढरपूर चौपदरीकरणात जमीन जाणार्‍यांना नुकसान भरपाई मिळणार : जयकुमार गोरे

सातारा-पंढरपूर चौपदरीकरणात जमीन जाणार्‍यांना नुकसान भरपाई मिळणार : जयकुमार गोरे

Published On: Apr 12 2018 1:18AM | Last Updated: Apr 11 2018 11:22PMखटाव : प्रतिनिधी 

सध्या काम सुरु असलेल्या सातारा - पंढरपूर चौपदरी रस्त्यात ज्या शेतकर्‍यांच्या जमिनी जात आहेत त्या शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळणार असल्याची माहिती आ. जयकुमार गोरे यांनी दिली. 

ना. चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि रस्ते विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या उपस्थित मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीत याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला. सातारा जिल्यातील माण, खटाव, कोरेगाव आणि सातारा तालुक्यातील बाधित शेतकर्‍यांना यामुळे दिलासा मिळाला आहे.

आ. गोरे म्हणाले, सातारा-पंढरपूर रस्त्याचे चौपदरीकरण करताना रस्त्याकडेच्या शेतकर्‍यांच्या  दोन्ही बाजूंना दहा दहा मीटर जमिनी बेकायदेशीरपणे आणि विनापरवाना अधिग्रहीत केल्या जात आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असणार्‍या रस्त्यापेक्षा अधिक रूंदीचा रस्ता रस्ते विकास महामंडळाकडून केला जात आहे. हे हस्तांतरणच बेकायदेशीर आहे. नियमानुसार होणार्‍या पीडब्लूडीच्या रस्त्याला आमचा विरोध नाही मात्र, सध्या ठेकेदारी पध्दतीने जबरदस्तीने शेतकर्‍यांना धमकावून शेतजमिनीतून रस्त्याचे काम केले जात आहे. काम करताना नियमांचे पालन होत नाही. पर्यायी रस्ता, रिफ्लेक्टर्स नसल्याने रोज अपघात होत आहेत. ठेकेदाराने रस्त्याचे काम करताना सर्व सुविधा देणे गरजेचे आहे. जमीन अधिग्रहणच्या 2014 च्या कायद्यानुसार सर्व बाधित शेतकर्‍यांना योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही आ. गोरे यांनी बैठकीत केली.

बांधकाम मंत्री ना. चंद्रकांत पाटील म्हणाले, रस्ते विकास महामंडळाने  दिवसात 15 मीटर टू मीटर जागा मोजून माहिती द्यावी. शेतकर्‍यांच्या जमिनी रस्ता चौपदरीकरणात जात असतील तर अतिरिक्त जमिनी अधिग्रहण करुन त्यांना नुकसान भरपाई देणे गरजेचे आहे. याविषयी केेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही माहिती देण्यात येईल. 

 

Tags : Satara Pandharpur, four lane highway, land,