Wed, May 22, 2019 22:44होमपेज › Satara › सावकारीतून चाकू हल्ला; दोघांना अटक

सावकारीतून चाकू हल्ला; दोघांना अटक

Published On: Dec 23 2017 8:48PM | Last Updated: Dec 23 2017 8:48PM

बुकमार्क करा

फलटण : प्रतिनिधी

फलटण येथील व्यावसायिकाला खासगी सावकारी प्रकरणात शिवीगाळ व दमदाटी करून त्यांच्या मुलाच्या हातावर चाकूने वार केल्याप्रकरणी संशयित दोघांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. 

याबाबत फलटण शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, किसन दादासाहेब शिंदे (रा. जाधववाडी, ता. फलटण) यांनी सनी संजय मोरे (वय 30, रा. मंगळवार पेठ, फलटण) याच्याकडून 18 ऑक्टोबर 2014 रोजी 20 हजार रुपये प्रतिमहिना 4 हजार रुपये व्याजाने घेतले होते. सनी मोरे यास शिंदे यांनी आत्तापर्यंत 96 हजारांची रक्‍कम मुद्दल व व्याजापोटी दिली आहे.

तरीही सनी मोरे व त्याचा मित्र भारत अशोक कांबळे (वय 24, रा. मंगळवार पेठ) यांनी वेळोवेळी शिंदे यांच्या घरी येऊन शिवीगाळ व दमदाटी केली. तसेच दि. 22 रोजी फलटण शहरातील घडसोली मैदान येथे वेल्डिंगचा गाळा असलेल्या ठिकाणी येऊन त्यांचा मुलगा शुभम व केतन यास मारहाण करून केतनच्या हातावर चाकूने वार केले.

या घटनेची फिर्याद किसन दादासाहेब शिंदे यांनी पोलिस ठाण्यात दिली असून, दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. तपास उपनिरीक्षक मुंढे करत आहेत.