Thu, Nov 22, 2018 00:11होमपेज › Satara › मायणीच्या अनिकेत भिसेचे ऊसपीक बहुद्देशीय यंत्र महाराष्ट्रात दुसरे

मायणीच्या अनिकेत भिसेचे ऊसपीक बहुद्देशीय यंत्र महाराष्ट्रात दुसरे

Published On: Apr 27 2018 1:10AM | Last Updated: Apr 26 2018 8:22PMमायणी : वार्ताहर

जळगाव येथे झालेल्या संमेलनात मायणी येथील भारतमाता विद्यालयातील अनिकेत भिसे याने तयार केलेल्या ऊस पीक बहुद्देशीय यंत्रास महाराष्ट्रात द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.

जळगाव येथे जैन हिल्स या ठिकाणी इनोव्हेशन मॉडेल या स्पर्धेत महाराष्ट्र व गुजरात राज्यातील अनेक शाळांनी सहभाग घेतलेला होता यामध्ये भारतमाता विद्यालयातील अनिकेत भिसे यांनी तयार केलेल्या ऊस पीक बहुद्देशीय यंत्रास महाराष्ट्रात व गुजरात राज्यात द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. 

ऊस पिकातील अगदी पूर्व मशागतीपासून ते ऊस काढणीपर्यंत सर्व कामे  सुलभतेने हे यंत्र करते. कृषी क्षेत्रातील सर्व कंपन्यांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. अनिकेतला विक्रम झरेकर यांचे  मार्गदर्शन  मिळाले.या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन सुरेंद्र गुदगे, सचिव सुधाकर कुबेर आदींनी त्याचे अभिनंदन केले.

 

Tags : satara, satara news, Aniket Bhise, sugarcane multi purpose machinery,