Sat, Jun 06, 2020 01:46होमपेज › Satara › बजने दे ढोल ताशे धडक... धडक...

बजने दे ढोल ताशे धडक... धडक...

Published On: Sep 14 2018 1:33AM | Last Updated: Sep 13 2018 9:03PMसातारा : विशाल गुजर

जिल्ह्यात डॉल्बी बंदीमुळे शहारपासून ते गावागावापर्यंत ढोल—ताशा या पारंपारिक  वाद्याला प्रचंड महत्व प्राप्‍त झाले आहे. जिल्ह्यात ढोल—ताशा पथकांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली असून यंदाही गणेशोत्सवात पारंपारिक वाद्याचा वापर वाढला आहे. सर्वत्र ढोल ताशाचा आवाज घुमू लागला आहे.

लोककलेचा समृध्द वारसा आणि त्यातील नाना विविधता हे महाराष्ट्राला लाभलेले वरदान आहे. महाराष्ट्राच्या कणखर आणि रांगड्या परंपरेला शोभणारा ढोलताशाचा गजर ही खरी महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख आहे. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कालखंडापासून महाराष्ट्रात ढोल ताशाच्या वादनाची परंपरा सुरु आहे. अलिकडे गणपती उत्सवाला व्यापक स्वरुप प्राप्‍त झाले आहे. त्यामध्ये डॉल्बीच्या दणादणाटानेही नुसता धुडघूस घातला होता. मात्र गेल्या दोन वर्षांपासून उच्च न्यायालयाच्या आदेेशामुळे प्रशासनानेे गणेशोत्सवात डॉल्बीला पूर्णपणे बंदी घातली आहे. त्यामुळेच सर्वत्र ढोल—ताशाचा नाद घुमू लागला आहे.

लाडक्या गणरायाचे आगमन झाले असून सातारा शहरात तर 15 हून अधिक ढोल —ताशा पथकांचा निनाद गल्ली बोळात घुमू लागला आहे. एका पथकामध्ये सुमारे 60 ते 250 हून अधिक सदस्य सहभागी झाले आहेत. ही पथके  बक्षिसातील पैशातून ढोल—ताशांची दुरुस्ती, सदस्यांचा ड्रेसकोड, जेवण, कार्यक्रमाच्या ठिकाणी जाण्या येण्याचा खर्च बक्षीसातून भागविला जातो. सध्या तर सातार्‍यातील ढोल—ताशा पथकातील मुले, तरुण—तरुणी, पुरुष—महिला ढोल—ताशाच्या नादात अक्षरक्ष: गुंगून गेले आहेत.

युवती व स्त्रियांचा सहभाग

सातार्‍यातील बहुतांशी ढोल—ताशा पथकात निम्या महिला असातात. तसेच महिलांचीही चार ते पाच पथके आहेत. आपले दैनंदिन कामे, शाळा, महाविद्यालये करत महिला ढोल —ताशा पथकात उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत.  डोक्याला भगवा फेटा, पांढरा कुर्त्याचा पेहराव करत महिला कमरेला ढोल बांधून ढोल—ताशा घुमवताना दिसून येत आहेत.