Sun, Jul 21, 2019 08:14होमपेज › Satara › गवडीत बेकायदेशीर चंदन जप्त 

गवडीत बेकायदेशीर चंदन जप्त 

Published On: Jun 21 2018 1:20AM | Last Updated: Jun 20 2018 11:47PMसावली : वार्ताहर    

गवडी ता. जावली येथे बेकायदेशीर चंदन वाहतूक करणार्‍यांवर वनविभागाने कारवाई करुन पीकअप व 23 किलो चंदन जप्त केले. जप्‍त करण्यात आलेल्या चंदनाची बाजारातील किंमत 60 हजार रूपये आहे. यामध्ये वाहन चालकासह 1 महिलेस ताब्यात घण्यात आले आहे. 

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, मेढा वनपरिक्षेत्राचे अधिकारी व कर्मचारी गस्त घालत असताना मिळालेल्या माहितीनुसार, गवडी ता.जावली येथे बोलेरो पीकअप (क्र एम.एच 11 ए.जी 3087) ची तपासणी केली. यामध्ये 1 महिला व चंदन कटाईचे हत्यार तसेच  साहित्य यासह 23 किलो सोलीव चंदन लाकूड मिळून आले. कारवाईतील सर्व साहित्य वन विभागाने जप्त केले आहे. 

याप्रकरणी वाहन चालकासह 1 आरोपी महिला बुंडी पारधी सध्या रा.आंबेघर ता.जावली यांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई मेढ्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन डोंबाळे, वनपाल आर.जी.सय्यद, केळघर वनरक्षक  मीरा कुटे व  रे.सु. कावळे यांनी केली.