Fri, Feb 22, 2019 15:37होमपेज › Satara › बेकायदा वाळू उपसा; दोघांना अटक 

बेकायदा वाळू उपसा; दोघांना अटक 

Published On: Jun 23 2018 1:23AM | Last Updated: Jun 22 2018 10:26PMदहिवडी : प्रतिनिधी 

म्हसवडजवळ नदीच्या पात्रात असणारी वाळू चोरून घेऊन जात असताना दहिवडी पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी पाठलाग करून दोन डंपर वाळूसह जप्त केले. दहा लाखांच्या मुद्देमालासह दोन्ही डंपरचालकांना दहिवडी पोलिसांनी अटक केली.

माणगंगा नदीपात्रात अवैध वाळू उपसा सुरू असून याबाबत रान उठले होते. उपजिल्हाधिकारी यांनी गुरुवारी म्हसवडचा वाळू लिलाव रद्द केला आहे. तरीही चोरटी वाळू वाहतूक सुरू असल्याची खबर दहिवडीचे सपोनि प्रवीण पाटील यांना मिळाली. त्यांनी संध्याकाळी आठ वाजता सापळा लावून चोरीची वाळू उपसा करून घेऊन जाणार्‍या दोन ट्रकचा पाठलाग करून हे ट्रक स्वरूपखानवाडी गावच्या हद्दीत पकडले. त्यांच्याबरोबर सहा. फौजदार सुनील बागल, हवालदार प्रमोद कदम, रवींद्र बनसोडे उपस्थित होते. दोन्ही ट्रक दहिवडी पोलीस ठाण्यात आणले असून सुमारे दहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

डंपरचे मालक फरीद बाबू शेख व चांद सिकंदर शेख (दोघेही रा.सदरबझार सातारा) यांना अटक करण्यात आली आहे. दोघेही वाहन चालक परवाना, डंपरची कागदपत्रे न बाळगता बिगर परवाना वाळू उत्खनन करून डंपरमधून चोरटी वाहतूक करताना सापडले असल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला आहे.