Fri, Jul 19, 2019 18:35होमपेज › Satara › बेकायदा गौण खनिज उत्खनन; सात जणांवर गुन्हा दाखल

बेकायदा गौण खनिज उत्खनन; सात जणांवर गुन्हा दाखल

Published On: Feb 23 2018 1:17AM | Last Updated: Feb 23 2018 1:17AMवडूज : वार्ताहर

अंबवडे (ता. खटाव) येथील येरळा नदी पात्रातील अंदाजे 56 ब्रास अवैध वाळू उत्खननप्रकरणी अनिल अरविंद पवार, अंकुश नारायण बरकडे, विक्रांत शंकर वाघोले, संतोष विलास बरकडे (सर्व रा. अंबवडे), बाबू जाधव (रा. नढवळ), दाऊदभाई मुलाणी (रा. वडूज) व बाबू जालिंदर जाधव (रा. गुरसाळे) या 7 जणांविरोधात वडूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

याबाबत पोलिस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, अंबवडे (ता. खटाव) येथील सोमनाथ सीताराम काकडे यांच्या हद्दीतील गट नं. 616 मधील येरळा नदीपात्रातील अवैध वाळू उत्खनन झाल्याबाबतचा तक्रारी अर्ज दिला होता. त्याअनुषंगाने  गावकामगार तलाठी अक्षय साळुंके  यांनी स्वतः पंचा समक्ष घटनास्थळी जाऊन जागेची पाहणी केली. प्रत्यक्ष पाहणी करता अंदाजे 56 ब्रास वाळू उत्खनन झाल्याचे दिसून आले. 

गावकामगार तलाठी अक्षय ब्रह्मदेव साळुंके यांनी फिर्याद दिली. या फिर्यादीवरून 7 जणांवर गुन्हा दाखल झाला असून या घटनेचा तपास पो. हवा शांतीलाल ओंबासे करत आहेत.