Wed, Jan 23, 2019 02:21होमपेज › Satara › दुचाकी अपघातात अवैध दारु विक्री करणारा ठार 

दुचाकी अपघातात अवैध दारु विक्री करणारा ठार 

Published On: Apr 30 2018 8:49AM | Last Updated: Apr 30 2018 8:49AMकुडाळ (जि. सातारा): प्रतिनिधी

कुडाळ-सर्जापूर (ता जावळी) रोडवर झालेल्‍या दुचाकीच्या अपघातात अवैध दारू विक्री करणारा ठार झाला आहे. मधुकर सपकाळ (वय, 50 रा. पासन, ता, जावळी) असे अपघातात ठार झालेल्‍या दारु विक्रेत्‍याचे नाव असून, तो चोरून दारुची विक्री करत होता. आज (३० एप्रिल)सकाळी सहाच्या सुमारास हा अपघात झाला.  

जावलीत गेल्या ८ वर्षांपासून अवैध दारूचा सुळसुळाट सुरु आहे. गावो गावी अवैध दारूची चोरटी विक्री करणारे विविध शक्कल लढवून दारू विकत असतात. अशाच प्रकारे साताऱ्यावरून देशी  दारू घेऊन निघालेला दुचाकीस्वार मधुकर सपकाळ शॉट कटने कुडाळ मार्गे पानसला निघाला होता. पोलिसांच्या भीतीने तो वेगात जात असतानाच कुडाळ सर्जापूर रोडच्या भिसे वस्ती येथील वळणावर त्‍याची दुचाकी  गटारात शिरली. त्‍यामुळे त्‍याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यात त्‍याचा जागेवरच मृत्‍यू झाला.  

दुचाकीला अडकवलेल्‍या पिशवीमध्ये शंभरहून अधिक देशी दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला दिसून आला. तसेच त्‍याने पाठीवर अडकवलेल्या बॅगमध्येही दारूच्या बाटल्या होत्या. अपघात झाल्या नतंर एक तास तो जखमी अवस्थेतच पडला होता. डोक्‍यातून रक्‍तस्‍त्राव झाल्‍याने त्‍याचा मृत्‍यू झाला.  

Tags : satara, district, kudal, Illegal liquor seller