Sun, May 26, 2019 15:05होमपेज › Satara › गुजरातमध्ये मोदी सरकार पडले तर आनंदच: राजू शेट्टी(व्हिडिओ)

गुजरातमध्ये मोदी सरकार पडले तर आनंदच: राजू शेट्टी (व्हिडिओ)

Published On: Dec 16 2017 2:09PM | Last Updated: Dec 16 2017 2:19PM

बुकमार्क करा

फलटण : प्रतिनिधी 

शेतकऱ्यांना फसवणाऱ्या भाजपचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा गुजरातमध्ये पराभव झाल्यास आनंद होईल, असे खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले. फलटण येथे पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी केंद्र सरकारवर पुन्हा एकदा हल्ला चढवला. 

भाजपचा व ‘एनडीए’शी काडीमोड घेतला असून या पुढे त्यांना पाठिंबा देऊच शकणार नाही.  देशातील 184 शेतकरी संघटनेचे नेते व कार्यकर्ते एकत्र येऊन केंद्र सरकारला धडा शिकवणार असल्याचे शेट्टी म्हणाले. आजपर्यंत फक्त मते मिळवण्यासाठी शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीर उभे आहोत, असे म्हणणाऱ्या राजकीय पक्षांना लेखी स्वरूपात द्यावे, असे खा. राजू शेट्टी यांनी सांगितले. 

गुजरात निवडणुकीवर बोलताना ते म्हणाले, गुजरातमध्ये मोदी सरकार पडले तर आपल्याला आनंदच होईल. कारण भाजपने शेतकऱ्यांना फसवले असून केंद्र सरकारला आता शेतकरीच पराभव करतील, शेट्टी म्हणाले. 

यावेळी राजेंद्र ढवाण पाटील,सातारा युवा आघाडी जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, फलटण तालुका अध्यक्ष नितीन यादव, व सचिन खानविलकर उपस्थित होते.