होमपेज › Satara › पतीच्या मारहाणीत पत्नीचा मृत्यू

पतीच्या मारहाणीत पत्नीचा मृत्यू

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

फलटण : प्रतिनिधी

पिंप्रद (ता. फलटण) येथील पती व पत्नीच्या झालेल्या वादातून पतीने केलेल्या जबर मारहाणीत पत्नी ठार झाल्याची घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंप्रद येथे नवनाथ अरुण खुडे याने पत्नी उर्मिला नवनाथ खुडे यांना दि. 27 रोजी रात्री 3.30 वाजता मारहाण केली होती. यावेळी त्यांच्या डोक्याला मार लागून त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

दि. 28 रोजी रात्री 11.30 वाजता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याबाबतची फिर्याद उर्मिला यांचे वडील ज्ञानेश्‍वर कोंडीबा तुपे यांनी दिली असून पती नवनाथ अरुण खुडे यास अटक केली आहे.