होमपेज › Satara › सातार्‍यातील ढेबेवाडीत घर जळून खाक

सातार्‍यातील ढेबेवाडीत घर जळून खाक

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सणबूर : वार्ताहर 

पाटण तालुक्यातील ढेबेवाडीजवळ वाल्मीकी पठारावरील घोटील येथे शॉर्टसर्किटमुळे घराला आग लागली. या आगीमध्ये संपूर्ण घर जळून खाक झाले असून संसारोपयोगी साहित्य तसेच दोन म्हैशी, एक खोंड, कपडे, धान्य आगीत भस्मसाथ झाले आहे. घरातील सर्व साहित्य जळाल्याने चौघा भावांचा संसार उघड्यावर पडला आहे. त्यामुळे ऐन थंडीत त्यांच्यापुढे निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला असून त्यांना वीज कंपनीने त्वरित नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. सोमवार दि. २७ रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास लागलेल्या या आगीत मोठे नुकसान झाले आहे. ग्रामस्थांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्याने ग्रामस्थांचे प्रयत्न अपुरे पडले.