Thu, Feb 21, 2019 09:05होमपेज › Satara › घरगुती वादातून पत्नीचा खून 

घरगुती वादातून पत्नीचा खून 

Published On: Jan 05 2018 1:27AM | Last Updated: Jan 04 2018 10:25PM

बुकमार्क करा
फलटण : प्रतिनिधी

जिंती (ता. फलटण) येथे घरगुती वादातून पतीने केलेल्या अमानुष मारहाणीत महिला ठार झाली. याप्रकरणी फलटण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.  सौ. कल्पना शांताराम भोसले (वय 45, रा. जिंती) यांचा व पती शांताराम काशिनाथ भोसले यांच्यात दि.3 रोजी 10 ते मध्यरात्रीपर्यंत वाद झाला.

या वादातून चिडून जाऊन पतीने लाकडाच्या दांडक्याने त्यांना बेदम मारहाण केली. यामध्ये सौ. कल्पना जबर जखमी झाल्या व त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी उमा प्रकाश जोशी यांनी फिर्याद दिली आहे.