होमपेज › Satara › हॉटेल माउंट पर्लच्या मॅनेजरची आत्महत्या

हॉटेल माउंट पर्लच्या मॅनेजरची आत्महत्या

Published On: May 24 2018 1:33AM | Last Updated: May 23 2018 11:17PMपाचगणी : वार्ताहर

महाबळेश्‍वर तालुक्यातील दुधवाट गावच्या शिवारात रस्त्याच्या कडेला 50 मी. अंतरावर अज्ञात व्यक्‍तीने नायलॉनच्या दोरीने गळफास घेतला असल्याचे आढळून आले असून मृतदेह सडलेला आहे.

अवकाळीचे पोलिसपाटील शैलेश विष्णू भिलारे यांना याबाबतची खबर मिळाल्यानंतर त्यांनी ही खबर पाचगणी पोलिस ठाण्यात दिली. याबाबतची माहिती मिळताच अवकाळी व नाकिंदा गावचे लोक घटनास्थळी जमा झाले. त्यामधील गणेश प्रकाश शेडगे यांनी या व्यक्‍तीची ओळख पटवली असून तो भिलार (ता. महाळेश्‍वर) येथील असून नाकिंदा  येथील माउंटपर्ल हॉटेलचा तो मॅनेजर आहे. मुर्ली नृसिंह मुल्लू (वय  44, मूळ रा. गांधीनगर, आंध्र प्रदेश) असे त्या मृत व्यक्‍तीचे नाव आहे. अधिक तपास सपोनि तृप्ती सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली वैभव भिलारे करत आहेत.