Mon, Jun 24, 2019 16:37होमपेज › Satara › जिल्ह्यात सहकारी तत्त्वावर रुग्णालये  : सुभाष देशमुख

जिल्ह्यात सहकारी तत्त्वावर रुग्णालये  : सुभाष देशमुख

Published On: Aug 06 2018 1:56AM | Last Updated: Aug 05 2018 10:44PMम्हसवड : प्रतिनिधी

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सहकारी तत्वावर रूग्णालये उभारण्याचा निर्णय लवकरच शासन घेणार असून विना सहकार नही उध्दार या तत्वाने सर्वसामान्य गोरगरिब रूग्णांना सेवा देण्यात येणार आहे. सहकारी तत्वावरील रूग्णालयाची सुरूवात सिटी हॉस्पिटलचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. रणजित कापसे यांनी म्हसवड येथून केली असून त्यांना सर्वतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही ना.सुभाषराव देशमुख यांनी दिली.

म्हसवड  येथे सिटी हॉस्पिटलच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी आ. डॉ. दिलिप येळगावकर, अजितराव राजेमाने, पंचायत समितीचे सभापती रमेश पाटोळे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई, जि. प. सदस्या डॉ. सौ. भारती पोळ, डॉ. काळे, डॉ. महादेव कापसे आदी उपस्थित होते.

ना. देशमुख म्हणाले डॉ. महादेव कापसे यांचा आदर्श वारसा जोपासत डॉ. रणजित कापसे यांनी शहरात जाण्याऐवजी आपल्या दुष्काळी माणदेशात  गरीब रुग्णांची सेवा करण्याची भूमिका घेतली हा निर्णय स्तुत्य आहे. पैसे नाहीत म्हणून एकही रूग्ण माघारी जाणार नाही. हे हॉस्पिटल गरिबांसाठी मदत केंद्र बनावे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक चांगला निर्णय घेतला असून देशात 10 कोटी परिवाराचा विमा उतरवून प्रत्येक रूग्णासाठी 5 लाख रू. विमा उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. 

यामुळे गोरगरिबांना आरोग्यसेवा मोफत मिळणार आहे, असेही ना. देशमुख म्हणाले.  कार्यक्रमास भाजपचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब मासाळ, सरपंच सचिन गुदगे, बाळासाहेब खाडे,  दिलिप तुपे, अ‍ॅड.हिरवे, मंगेष खरात आदि उपस्थित होते.प्रास्तविक डॉ. महादेव कापसे यांनी केले.