Sat, Jul 20, 2019 21:28होमपेज › Satara › तडीपार गुंड बेड्यांसह पसार

तडीपार गुंड बेड्यांसह पसार

Published On: Jan 02 2018 1:15AM | Last Updated: Jan 01 2018 10:52PM

बुकमार्क करा
सातारा : प्रतिनिधी

येथील शाहूपुरी पोलिस ठाण्यातून अटकेतील तडीपार गुंड बेड्यांसह फरार झाल्यानंतर त्याचा शोध घेण्यासाठी सोमवारी सायंकाळी पोलिसांची धावपळ सुरू झाली. या पोलिस ठाण्यात आरोपींसाठी स्वतंत्र पोलिस कोठडी नसल्यामुळे ही घटना घडल्याचे समजते.

याबाबतची अधिक माहिती अशी की, नामदेववाडी झोपडपट्टी परिसरातील कैलास नथू गायकवाड हा तडीपार गुंड नुकताच सातार्‍यात फिरत असल्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचार्‍यांना आढळून आले. त्याला ताब्यात घेऊन संबंधित पोलिसांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात हजर केले.

या ठिकाणी त्याच्यावर 141 कलम लावून त्याची चौकशी चालू असताना दुसर्‍या एका प्रकरणातील काही मंडळी पोलिस ठाण्यात आली. ठाण्यातील कर्मचारी या मंडळींच्या तक्रारीकडे लक्ष देत असताना कैलास हळूच बाहेर सटकला. काही वेळानंतर कैलास गायब झाल्याचे पोलिस ठाण्याच्या कर्मचार्‍यांच्या लक्षात आले. त्यावेळी त्यांची धावपळ सुरू झाली.

दरम्यान, कैलास हा हातातील बेड्यांसह फरार झाल्याच्या माहिती समजताच वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी कैलासच्या शोधासाठी वेगवेगळ्या ठिकाणी पथके रवाना केली. या पोलिस ठाण्यात अटकेतील आरोपींसाठी स्वतंत्र पोलिस कोठडी नसल्यामुळे ही आफत ओढावल्याचे स्पष्ट झाले आहे.