Mon, Jul 22, 2019 04:52होमपेज › Satara › ‘पुढारी’ कस्तुरी क्‍लबतर्फे होम मिनिस्टर

‘पुढारी’ कस्तुरी क्‍लबतर्फे होम मिनिस्टर

Published On: Jul 03 2018 1:54AM | Last Updated: Jul 02 2018 8:42PMसातारा : प्रतिनिधी

दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लबच्या वतीने महिला व युवतींसाठी मंगळवार, दि. 3 जुलै रोजी सायं. 4 ते 7 या वेळेत सौभाग्य मंगल कार्यालय सातारा येथे होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी  महिला व युवतींसाठी वेशभूषा स्पर्धा, दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार असे कार्यक्रम होणार आहेत.  

दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लब-च्यावतीने महिला व युवतींसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी  विविध स्पर्धा, वर्कशॉप घेतले जातात. त्यामुळे महिलांच्या  अंगी असलेल्या कौशल्यांना वाव मिळत असतो. 

दहावी व बारावी बोर्ड परीक्षेचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. यामध्ये  उज्वल यश मिळवलेल्या गुणवंतांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप टाकल्यास पुढील वाटचालीत प्रोत्साहन मिळावे, यासाठी  या गुणवंतांचा सत्कार करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाचे सहप्रायोजक  गिरीषा वेल्थ मेकर प्रा. लि.चे शंकरराव कर्पे हे आहेत. या संस्थेकडून लोकांचा आर्थिकस्तर व गुंतवणूक याबाबतची जागरुकता वाढवण्याचे कार्य व भविष्यातील पैशाचे योग्य नियोजन व मार्गदर्शन केले जाणार आहे. होममिनिस्टर या कार्यक्रमात सहभागी महिलांचे विविध खेळ घेतले जाणार आहेत.

वेशभूषा स्पर्धेसाठी विविध टीव्ही चॅनेल्सवरील मराठी सिरियल थीम ठेवण्यात आली असून सहभागी स्पर्धकांनी कोणत्याही एका पात्राची वेशभूषा परिधान करावयाची आहे, असे आवाहन दै. पुढारी कस्तुरी क्लबच्यावतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी तेजस्विनी बोराटे (8805007192)  यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.