Wed, Jul 17, 2019 20:04होमपेज › Satara › गडकोट मोहिमेत धारकर्‍यांनी सहभागी व्हावे : संभाजी भिडे

गडकोट मोहिमेत धारकर्‍यांनी सहभागी व्हावे : संभाजी भिडे

Published On: Jan 19 2018 2:00AM | Last Updated: Jan 18 2018 10:18PMखंडाळा : वार्ताहर 

रायगडावर सुवर्ण सिंहासन स्थापनेचा सोडलेला संकल्प पूर्ण करण्यासाठी दि. 30 रोजी रायरेश्‍वरावर हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली जाणार आहे. देशाच्या इतिहासात हा महत्वाचा क्षण ठरणार आहे. यासाठी तमाम धारकरी व शिवभक्तांनी प्रतापगड ते रायरेश्‍वर या गडकोट मोहिमेत सहभागी होऊन ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी केले.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदूस्थान खंडाळा तालुक्याच्या वतीने आयोजित गडकोट मोहिमेबद्दल मार्गदर्शन करताना भिडे गुरुजी बोलत होते. 

यावेळी ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज हे भारतमातेचा प्राण आहेत. छ. शिवरायांनी जगण्याचा तर छ. संभाजीराजांनी मरण्याचा मंत्र दिला. हा बीजमंत्र जपण्यासाठी व तरूणांना ऐतिहासिक वारसा कळवण्यासाठ गडकोट मोहिमेचे आयोजन केले आहे. दोन्ही राजांच्या अखंड हिंदूस्थानची इच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी धारकरी व शिवभक्तांची आहे. यासाठी हिंदुस्थानचा खरा इतिहास कळण्यासाठी भारतातील सर्व राज्यात मराठ्यांचा इतिहास इयत्ता पहिली ते दहावीच्या अभ्यासक्रमात समाविष्ठ करावा, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करणार असल्याचे भिडे गुरूजींनी सांगितले. 

यावेळी खंडाळा तालुक्यातील बावडा ग्रामस्थांच्यावतीने सुवर्ण सिंहासन स्थापनेसाठी एक लाख रुपयांचा निधी देणार असल्याची घोषणा करण्यात आली. तालुका कार्यवाहक म्हणून गौरव पवार यांची नियुक्‍ती करण्यात आली होती. यावेळी जिल्ह्यातील विविध तालुक्यातील धारकरी उपस्थित होते.