Sun, Oct 20, 2019 01:08होमपेज › Satara › कराड: सहाय्यक फौजदारासह हवालदारास मारहाण

सहाय्यक फौजदारासह हवालदारास मारहाण

Published On: Dec 03 2017 2:56PM | Last Updated: Dec 03 2017 2:56PM

बुकमार्क करा

कराडः प्रतिनिधी

येथील दत्त चौक परिसरात कामावर असलेल्या वाहतुक शाखेच्या सहाय्यक फौजदारासह हवालदारास धक्काबुक्की करत मारहाण करण्यात आली आहे. रविवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

कराड शहर पोलिस ठाण्यातील वाहतूक शाखेचे सहाय्यक फौजदार व हवालदार दोघेजण दत्त चौक ते कर्मवीर पुतळा परिसरात वाहतूक सुरळीत करण्याचे काम करत होते. सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून ट्रिपल सिट आलेल्या युवकांना त्यांनी अडवले. यावेळी आम्ही कोण आहे ओळखत नाही का? असे म्हणत त्यांनी पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांना धक्काबुक्की करत त्यांना मारहाण केली. यावेळी युवकांबरोबर झालेल्या झटापटीत हवालदाराच्या छातीवरील नेमप्लेट तुटली असून, छातीला दुखापत झाली आहे. तर, सहाय्यक फौजदारांच्या छातीवर असलेले पदक तुटले आहे. तशाही परिस्थितीत पोलिसांनी दोघांनाही पकडून शहर पोलिसात आणले. संबधीत युवकांवर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे. 

दरम्यान, पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या युवकांमध्ये माजी नगराध्यक्षाच्या मुलगा असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच दत्त चौक परिसरात तसेच शहर पोलिस ठाण्याच्या परिसरात मोठी गर्दी जमली होती.