Fri, May 24, 2019 08:40होमपेज › Satara › हिल सायकलथॉन स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

हिल सायकलथॉन स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

Published On: Jan 30 2018 1:51AM | Last Updated: Jan 29 2018 10:46PMसातारा : प्रतिनिधी

येथील यंग इन्स्पिरेशन चॅरिटेबल सोसायटी (कट्टा ग्रुप) यांच्यावतीने क्रिडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी व प्रदुषणमुक्त सातार्‍यासाठी घेण्यात आलेल्या सातारा हिल सायकलथॉन स्पर्धेत पुरूष गटात संतोष विभुताली व महिला गटात  पुजा दानोले यांनी प्रथम क्रमांक पटकावला. 

पश्‍चिम महाराष्ट्रात प्रथमच सातारा हिल सायकलथॉन स्पर्धेचा प्रारंभ पोलिस परेड ग्राऊंड येथून सकाळी 6 वाजता जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील यांच्या हस्ते फ्लॅग दाखवून करण्यात आला. महिला व पुरुष गटात मुख्य स्पर्धा 55 किमीची  झाली तर फनराईड स्पर्धा 15 किमीची झाली.  

55 कि.मी. मध्ये पुरूष गटात  संतोष विभुताली यांनी 1 तास 51 मिनिटे 31 सेकंदात अंतर पार करून प्रथम क्रमांक पटकावला. दिलीप माने यांनी 1 तास 51 मिनिटे 32 सेकंदात अंतर पार करून द्वितीय क्रमांक पटकावला. प्रकाश ओलेकर याने 1 तास 51 मिनीटे 34 सेकंदात अंतर पार करून तृतीय क्रमांक पटकावला.

महिला गटात पुजा दानोले हिने 2 तास 28 मिनीटे 16 सेकंदात अंतर पार करून प्रथम, मनवी पाटील यांनी 2 तास 40 मिनीटे 6 सेकंदात अंतर पार करून द्वितीय तर प्रांजली पाटोळेने 2 तास 48 मिनीटे 7 सेकंदात अंतर पार करून तृतीय क्रमांक पटकावला.सातार्‍यातील तुषार भोईटे व विनय नाईक हे सायकलपट्टू विजयी ठरले.

स्पर्धा मार्गावर विविध ठिकाणी स्पर्धकांसाठी एनर्जी ड्रिंक, पाणी व मेडिकल तसेच सायकल रिपेअर किटची सोय होती. स्पर्धा मार्गावर ठिकठिकाणी नागरिक स्पर्धकांना प्रोत्साहित करताना दिसत होते. जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, अध्यक्ष मंगेश जाधव व उपाध्यक्ष प्रवीण पाटील, सचिव प्रफुल्ल शहा, खजिनदार धनंजय खोले व अन्य पदाधिकार्‍यांच्या हस्ते  दोन्ही गटातील विजेत्यांना  अनुक्रमे 35 हजार, 25 हजार व 15 हजार रुपये, ट्रॉफी मेडल व प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला.