Tue, Sep 25, 2018 05:31होमपेज › Satara › बारामतीकरांना शरद पवारांनी फसवले : हेमंत पाटील

बारामतीकरांना शरद पवारांनी फसवले : हेमंत पाटील

Published On: Feb 02 2018 1:35AM | Last Updated: Feb 01 2018 10:31PMसातारा : प्रतिनिधी :

ज्या बारामतीकरांनी देशाचे राजकारण शिकवले, देशात-राज्यात केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, खासदार, आमदार तसेच आत्ता जानकर यांना कॅबिनेट मंत्री अशी सत्तेत पदे दिली त्यांनीच बारामतीकरांचा विश्‍वासघात करून बारामतीची वाट लावल्याचा आरोप भारत अगेन्स्ट करप्शनचे अध्यक्ष व रासपचे हेमंत पाटील यांनी केला/.

याबाबत हेमंत पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, बारामतीमध्ये धनगर समाज आणि मातंग समाज जास्त प्रमाणात आहे. तरीही या नेत्यांना अहिल्यादेवी होळकर आणि साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक बांधता आले नाही. या विभागात आत्तापर्यंत 25  वर्षात 2100 कोटी खर्च झाले परंतु, अन्न, वस्त्र, निवारा आणि व पाण्याची सोय होऊ शकली नाही. भाजपा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना बारामतीत अपयश आले आहे. आम्हाला फक्त एकदाच संधी द्या, हे ब्रीद वाक्य असलेल्या भारत अगेन्स्ट करप्शनवर एकदाच विश्‍वास ठेवा, महाराष्ट्रात मराठवाडा, विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्रात ताकद वाढत आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पश्‍चिम महाराष्ट्रात साखर कारखाने, सहकारी बँका, सहकारी उद्योग आणून खासदार, आमदार मोठे केले, खरा शेतकरी भिकारी बनवला. पैशाच्या जोरावर राष्ट्रवादीने अन्याय व भ्रष्टाचार केला, हे जनता विसरणार नाही, असेही पाटील म्हणाले.