Wed, Jul 15, 2020 13:14होमपेज › Satara › ‘निसर्ग’ वादळामुळे सातार्‍यात मुसळधार (Video)

‘निसर्ग’ वादळामुळे सातार्‍यात मुसळधार (video)

Last Updated: Jun 03 2020 1:15PM
सातारा : पुढारी वृत्तसेवा

निसर्गचक्री वादळ समुद्र किनार पट्टीवर घोंघावत असतानाच आता त्याचा परिणाम सातारा जिल्ह्यावर होऊ लागला आहे. या वादळामुळे सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात गेल्या २४ तासापासून मुसळधार पावसाच्या सरी कोसळू लागल्या आहेत. जावली, महाबळेश्वर, पाटण व सातारा तालुक्याला या पावसाने झोडपून काढले आहे. सोसाट्याचा वारा वाहत असल्याने अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या मोडून पडल्या.

सातारा जिल्ह्यात अ‍ॅलर्ट

अरबी समुद्रात आलेल्या निसर्ग वादळामुळे सातारा तालुक्यात पहाटे पासून वार्‍यासह जोरदार पाऊस पडण्यास सुरवात झाली असल्याने ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून अरबी समुद्रात निसर्ग वादळाची चर्चा मोठयाप्रमाणात सुरू होती. अखेर बुधवारी पहाटे पासून वार्‍यासह पाऊस पडण्यास सुरवात झाली आहे. महाबळेश्वर तालुक्यात पावसाची संताधार वाढली असून पाचगणीत देखील पावसाच्या सरी कोसळत आहेत.