Mon, Jan 21, 2019 01:22होमपेज › Satara › आरोग्य केंद्राचा साहेब एसीबीच्या जाळ्यात

आरोग्य केंद्राचा साहेब एसीबीच्या जाळ्यात

Published On: Dec 13 2017 3:43PM | Last Updated: Dec 13 2017 3:43PM

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

प्राथमिक आरोग्य केंद्र बामणोली (कसबे ता.जावली) येथील कनिष्ठ सहाय्यक तथा लिपीकाला ८५० रुपयांची लाच घेतल्‍याप्रकरणी सातारा लाचलुचपत प्रतिबंध विभागाने (एसीबी)  अटक केली. साहेब नागनाथ नागुलवाड (सध्या रा.श्री व सौ.अपार्टमेंट, शाहूनगर, सातारा मूळ रा.गुणीपूर जि.नांदेड) असे अटक केलेल्‍या लिपीकाचे नाव आहे. आरोग्य सेविकेने याबाबत तक्रार केली आहे.

पोलिस उपअधीक्षक सुहास नाडगौडा यांनी याबाबतची माहिती दिली आहे. या प्रकरणातील तक्रारदार आरोग्य सेविका महिलेला त्यांच्या दप्तर तपासणीसाठी लिपीक नागुलवाड याने ८५० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.