Thu, May 23, 2019 04:19होमपेज › Satara › कराडात स्त्री आरोग्याबाबत मार्गदर्शन

कराडात स्त्री आरोग्याबाबत मार्गदर्शन

Published On: Jul 28 2018 1:41AM | Last Updated: Jul 27 2018 7:37PMकराड : प्रतिनिधी 

दै.‘पुढारी’ च्या कस्तुरी क्लब व सह्याद्री हॉस्पिटल कराडच्यावतीने ‘संजीवनी’ हा स्त्री आरोग्याचा मूलमंत्र देणारा कार्यक्रम रविवार दि. 29 रोजी दु. 4 ते 7 यावेळेत स्व.सौ. वेणूताई चव्हाण सभागृह, कराड येथे आयोजित केला आहे.

प्रत्येक स्त्रीने आपल्या आरोग्यासाठी जागरूक रहायलाच हवे, आरोग्यदायी जीवन ही प्रत्येक यशाची गुरूकिल्‍ली असते. अनभिज्ञता, दुर्लक्षपणा यामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. साधारणत: चाळीशीनंतर महिलांच्या आरोग्यविषयक तक्रारी सुरू होतात. या तक्रारींवर योग्य उपचार, सल्‍ला असेल तर आयुष्याची दुसरी टर्मही सुखावह व आनंदी जगता येते. यासाठीच सह्याद्री हॉस्पिटल व पुण्यातील सुप्रसिध्द वंध्यत्व उपचार तज्ञ डॉ. सुप्रिया पुराणिक महिलांना मार्गदर्शन करणार आहेत. डॉ. पुराणिक यांना स्त्रीयांच्या विविध आरोग्यविषयक समस्यांचा व वैद्यकीय क्षेत्रातील 20 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे. कार्यक्रमात डॉ. पुराणिक आनंदी मेनॉपॉज, स्त्रियांमधील आजाराबाबत प्रतिबंधात्मक उपाय, वयात येणार्‍या मुलींच्या समस्या, मातृत्व जणू स्त्रीचा पुनर्जन्म या विषयावर सखोल माहिती देणार आहेत.  कार्यक्रमास महिलांना मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी श्रुती कुलकर्णी मो. 8805023653 यांच्याशी संपर्क साधावा. 

सह्याद्री कडून महिलांना विविध गिफ्टस्

सह्याद्री हॉस्पिटलकडून महिलांसाठी आकर्षक हेल्थ पॅकेजस दिली जाणार आहेत. तसेच सर्व तपासण्यांवर 30 टक्के सवलतीचे कार्ड सर्व उपस्थित महिलांना मिळणार आहेत. तसेच कार्यक्रमात उपस्थित असणार्‍या महिलांमधून 10 लकी ड्रॉ काढण्यात येणार असून सह्याद्री हॉस्पिटलकडून आकर्षक भेटवस्तु देण्यात येणार आहेत. 

नावनोंदणी करणार्‍यास भेटवस्तू

दै.‘पुढारी’ च्या कस्तुरी क्लबकडून महिलांची नवीन नावनोंदणी सुरू होत आहे. या कार्यक्रमावेळी 550 रूपये भरून नावनोंदणी करणार्‍या पहिल्या 100 सदस्यांना टप्परवेअरतर्फे आकर्षक भेटवस्तु मिळणार आहे.