Sat, Apr 20, 2019 08:22होमपेज › Satara › दीड हजाराची लाच घेताना ग्रामसेवक जाळ्यात

दीड हजाराची लाच घेताना ग्रामसेवक जाळ्यात

Published On: Jan 16 2018 8:11PM | Last Updated: Jan 16 2018 8:11PM

बुकमार्क करा
सातारा : प्रतिनिधी

बांधकाम केलेल्या घराची नोंद करून उतारा देण्यासाठी व वीज कनेक्शनसाठी ना हरकत दाखला देण्यासाठी दीड हजार रूपयांची लाच घेताना प्रतिबंधक विभागाने ग्रामसेवकाला रंगेहाथ पकडले. सचिन भरतराव गायकवाड (वय, ३७. अंबवडे बुद्रक, ता. सातारा)  असे अटक केलेल्‍या ग्रामसेवकाचे नाव आहे.   

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदारांनी अंबवडे बुद्रक येथे घराचे नवीन बांधकाम केले आहे. या घराची नोंद करून उतारा व वीज कनेक्शनसाठी ना हरकत दाखला देण्यासाठी सचिन गायकवाड याने तक्रारदारांकडे दोन हजार रूपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती एक हजार पाचशे रूपये देण्याचे ठरले होते. याबाबत तक्रारदारांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार केल्यानंतर याची पडताळणी करण्यात आली. यामध्ये तथ्य आढळल्यानंतर मंगळवारी अंबवडे बुद्रक येथे सापळा रचून गायकवाड याला दीड हजार रूपयांची लाच घेताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले.