Wed, Jul 24, 2019 05:43होमपेज › Satara › अहो आश्‍चर्यम्... ग्रामपंचायत सदस्यांचा झाला शपथविधी

अहो आश्‍चर्यम्... ग्रामपंचायत सदस्यांचा झाला शपथविधी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी 

आमदार, खासदारांचा  शपथविधी सगळ्यांनाच ज्ञात आहे. मात्र, निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांचा शपथविधी कोणी ऐकला किंवा पाहिला नव्हता. सातारा तालुक्यातील जकातवाडी या पुरोगामी गावात मात्र सदस्यांचा शपथविधी झाला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सदस्यांना पद व गोपनीयतेची शपथ देवून हे गाव दत्तक घेत असल्याचे जाहीर केले.

जकातवाडीची निवडणूक निवडणूक झाल्यानंतर ग्रा. पं. सदस्यत्वाचे प्रमाणपत्र राजकीय नेत्याकडून न घेता प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्‍यांकडून स्वीकारण्याचा मानस नवनिर्वाचित सरपंच चंद्रकांत सणस यांनी व्यक्त केला होता. त्यानुसार डॉ. कैलास शिंदे, गटविकास अधिकारी अमिता गावडे, विस्तार अधिकारी झोरे यांनी सदस्यांना शपथ दिली. याप्रसंगी कैलास शिंदे, सरपंच सणस यांनी मनोगत व्यक्‍त केले. 

जानवळे यांनी आरती प्रतिष्ठानच्यावतीने  रुग्णवाहिका ग्रामपंचायतीसाठी देण्याची ग्वाही दिली. उपसरपंच हणमंत भोसले, उत्तम सणस, शंकर दळवी, विनायक मोहिते, सखुबाई देशमुख, बिस्मील्ला शेख, संगीता शेळके, सुजाता माने, सोनाली शिंदे यांनी शपथ घेतली. यावेळी गणेश चव्हाण, राजश्री कांबळे, तृप्ती यादव, प्रल्हाद भोसले, रामचंद्र शिंदे, मनोहर चव्हाण, तानाजी जाधव, मनोहर जाधव, डॉ. सचिन भोसले, योगेश शिंदे, सचिन जाधव, विजय पडवळ, विशाल पोगडे, जनार्दन भोसले, दीपक देशमुख, राजेंद्र सुतार, निरंजन फडणीस, विक्रम सावंत, इनामदार, धनंजय धोंडे, उत्तम भोसले, महेश सपकाळ आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. सुत्रसंचालन राजेश भोसले यांनी केले. आभार ग्रामसेवक धुमाळ यांनी मानले.