Mon, Mar 25, 2019 04:55
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › ग्रामपंचायतींसाठी ८० जणांचे अर्ज

ग्रामपंचायतींसाठी ८० जणांचे अर्ज

Published On: Sep 08 2018 1:33AM | Last Updated: Sep 07 2018 10:18PMसातारा : प्रतिनिधी

जिल्ह्यातील 48 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक तर 3 ग्रामपचायंतीची पोटनिवडणूक होत आहे. ग्रामपंचयातींच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंचपदासाठी 14, तर सदस्यपदासाठी 66 असे एकूण 80 अर्ज शुक्रवार अखेर दाखल झाले. रिक्‍त 3 पदांसाठी एकही अर्ज अद्याप दाखल झाला नाही.

ऑक्टोबर 2018 ते फेब्रुवारी 2019 दरम्यान मुदत संपणार्‍या व नव्याने अस्तित्वात आलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका तसेच सरपंचपदासाठी थेट निवडणुकीद्वारे भरण्यात येणार्‍या रिक्‍त पदांच्या पोट निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील 48 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक, तर 3 ग्रामपंचयातींच्या 3 रिक्‍त जागांसाठी पोटनिवडणूक होत होत आहे. सार्वत्रिक निवडणुकीत कराड तालुक्यातील     16 ग्रामपंचायतींचे 16 सरपंचपदासाठी 10 तर 126 सदस्यपदासाठी 35 जणांनी अर्ज दाखल केले. पाटण तालुक्यातील 6 ग्रामपंचायतींच्या 6 सरपंचपदासाठी 1 तर 44 सदस्यपदासाठी फक्‍त एकच उमेदवारी अर्ज दाखल झाला. वाई तालुक्यातील 7 ग्रामपंचायतींच्या 7 सरपंचपदासाठी 2 तर 67 सदस्यपदासाठी 18 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

महाबळेश्‍वर तालुक्यातील 5 ग्रामपंचातींच्या 5 सरपंचपदासाठी तसेच 35 सदस्यपदासाठी अद्याप एकही अर्ज दाखल झाला नाही.  कोरेगाव तालुक्यातील 2 ग्रामपंचायतींच्या 2 सरपंचपदासाठी तसेच 14 सदस्यपदासाठी एकानेही अर्ज दाखल केला नाही. जावली तालुक्यातील 2 ग्रामपंचायतीच्या 2 सरपंचदासाठी तसेच 14 ग्रामपंचायत सदस्यपदासाठी एकानेही उमेदवारी दाखल केली नाही. माण तालुक्यातील एका ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी तसेच 7 सदस्यांसाठी एकानेही उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. जिल्ह्यातील 48 ग्रामपंचायतींच्या 48 सरपंचपदासाठी आजपर्यंत 14 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून 382 सदस्यपदांसाठी फक्‍त 66 जणांनी उमेदवारी दाखल केली आहे. पाटण, कोरेगाव तसेच जावली तालुक्यातील प्रत्येकी एका ग्रामपंचायतींच्या रिक्‍त 3 सरपंचपदासाठी पोटनिवडणूक  जाहीर झाली आहे. मात्र, संबंधित ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी अद्याप कुणीही उमेदवारी दाखल केलेली नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली. दरम्यान, इच्छुक उमेदवारांना दि. 11 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.