होमपेज › Satara › राज्यपाल राम नाईक कराडात

राज्यपाल राम नाईक कराडात

Published On: Dec 22 2017 1:29AM | Last Updated: Dec 21 2017 11:39PM

बुकमार्क करा

रेठरे बुद्रुक : प्रतिनिधी

कृष्णा उद्योग समूहाचे संस्थापक, सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पा) यांची 93 वी जयंती शुक्रवारी  विविध उपक्रमांनी साजरी होत आहे. जयंतीनिमित्त कृष्णा अभिमत विद्यापीठ संकुलाच्या आवारात आप्पासाहेबांच्या स्मृतिप्रीत्यर्थ म्युझियम साकारण्यात आले असून, आप्पासाहेबांचा  पूर्णाकृती पुतळाही उभारण्यात आला आहे. या म्युझियमचे लोकार्पण आणि पुतळ्याचे अनावरण सकाळी 10.30 वाजता उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी ‘भगीरथ’ या ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

य. मो. कृष्णा कारखाना, कृष्णा हॉस्पिटल, कामगार युनियन, गणेश मंडळ, कामगार सोसायटी, जयवंत इंजिनिअरिंग कॉलेज, नर्सिंग कॉलेज, रेठरे बुद्रुक सोसायटी, रेठरे बुद्रुक ग्रामपंचायत, ताराबाई विद्यालय, कृष्णा महाविद्यालय, कृष्णा बँक, साई उद्योग समूह, जयवंतराव भोसले पतसंस्था, दूध डेअरी, ग्रंथालय तसेच विविध संस्थांच्यावतीने आप्पांची जयंती करण्यात येणार आहे. रेठरे बुद्रुक येथे ‘सप्‍त सुरांच्या वाटा’ तसेच कृष्णा कारखान्यावर व्याख्यान होणार आहे.