Wed, May 22, 2019 17:07होमपेज › Satara › बनावट ओळखपत्र बनवून शासनाची फसवणूक  : डॉ. येळगावकर

बनावट ओळखपत्र बनवून शासनाची फसवणूक  : डॉ. येळगावकर

Published On: Jan 29 2018 1:40AM | Last Updated: Jan 28 2018 10:42PMवडूज : वार्ताहर

मायणी अर्बन बँकेचे बनावट ओळखपत्र तयार करून वडूज येथील सहा. दुय्यम निबंधक कार्यालय व शासनाची फसवणूक केली असल्याने फसवणूक, बनावट दस्तऐवज खरा म्हणून त्याचा उपयोग केल्याबद्दल व सामाईक इरादा या कलमान्वये  मुरलीधर खंडू वाघ यांच्याऐवजी अज्ञात तोतया, प्रशांत निवृत्ती सनगर, विवेक निवृत्ती सनगर, महेंद्र निवृत्ती सनगर, अनिल सुदाम माळी व प्रवीण विलास देशमुखे सर्व रा. मायणी यांच्या विरोधात वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून तपास पो. नि. यशवंत शिर्के  करीत आहेत. दरम्यान या गैर व्यवहाराबरोबरच इतर गैरव्यवहारांची पोलखोल  करणार असल्याची माहिती माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

डॉ. येळगावकर म्हणाले की, मायणी ता. खटाव येथील बेपत्ता मुरलीधर खंडू वाघ यांची सिटी सर्व्हे नं.833  याचे क्षेत्रफळ  71.5 चौ. मी., ग्रामपंचायत मिळकत नंबर 1089/24 अशी जागा होती.  15 एप्रिल 2013 रोजी बेपत्ता मुरलीधर वाघ यांच्या जागी बोगस व्यक्ती उभी करून व ओळखीचा पुरावा म्हणून मायणी अर्बन बँकेचे बनावट ओळखपत्र तयार करून दस्त क्रमांक 1777/2013 प्रमाणे व्यवहार पूर्ण केला. संबंधित दस्ताची नोंदणी पूर्ण करून शासनाची फसवणूक केल्याने यात सामील असणारे मुरलीधर खंडू वाघ यांच्या ऐवजी अज्ञात तोतया व्यक्ती, प्रशांत निवृत्ती सनगर, विवेक निवृत्ती सनगर, महेंद्र निवृत्ती सनगर, अनिल सुदाम माळी व प्रवीण विलास देशमुखे सर्व रा. मायणी यांच्या विरुद्ध वडूज पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हा नोंदविण्याकामी शांताराम बर्गे यांनी फिर्याद दिली आहे. 

सह. जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणातील वस्तुस्थितीची शहानिशा केली. याबाबत महसूल मंत्र्यांकडे सरपंच सचिन गुदगे व आपण स्वत: सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई होण्याबाबत लेखी निवेदन दिले आहे. दस्त क्रमांक 1777/2013 मधील लिहून देणार, लिहून घेणार, साक्षीदार लक्ष्मण उत्तम बागडे, अमोल दत्तात्रय गरवारे, ओळखदार अनिल माळी, प्रवीण देशमुखे यांच्यासह दि. मायणी अर्बन को. ऑप. बँक मुख्य शाखा मायणी यांना सुनावणीची संधी देऊन त्यांचे लेखी म्हणणे संबंधितांनी घेतले असल्याचे येळागावकर यांनी सांगितले. हा गुन्हा गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यासाठी पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांच्याकडे मागणी करणार असल्याचे डॉ. येळगावकर यांनी सांगितले. यावेळी सोमनाथ माळी, नगरसेवक अनिल माळी, वचन शहा, जयवंत पाटील, भाजपा शहाराध्यक्ष प्रदीप शेटे यांची उपस्थिती होती.