Fri, May 24, 2019 09:04होमपेज › Satara › ‘उपरा’कारांनी शालेय पुस्तके जाळून केला शासनाचा निषेध

‘उपरा’कारांनी शालेय पुस्तके जाळून केला शासनाचा निषेध

Published On: Dec 29 2017 1:31AM | Last Updated: Dec 28 2017 10:47PM

बुकमार्क करा
सातारा : प्रतिनिधी

पाठ्यपुस्तकांमध्ये चुकीचा अभ्यासक्रम, प्रत्येक विद्यापीठांचा अभ्यासक्रम वेगवेगळा याबाबत भारतीय समाजवादी रिपब्लिकन पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘उपरा’कार लक्ष्मण माने यांनी  शालेय पुस्तके जाळून शासनाचा निषेध केला.

लक्ष्मण माने यांनी 22 डिसेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  शासकीय नोकर भरती तत्काळ सुरू करा, सरकारी नोकरांच्या पेन्शन 2005 पासून सर्वांना सुरू करा, भटके विमुक्त, धनगर, वंजारी व विशेष मागासप्रवर्ग यांचा समावेश अनुसूचित जमातीत करा,  कॉन्ट्रॅक्ट पध्दतीने भरती बंद करा,  किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी, खासगीकरण केलेल्या सर्व सेवा उद्योगांना लागू करा आदी मागण्यांसाठी त्यांनी चक्री उपोषण सुरू केले आहे. आंदोलनाचाच एक भाग म्हणून गुरूवारी शालेय पुस्तके जाळून शासनाचा निषेध करण्यात आला. यावेळी समाजवादी रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान, भिमशक्ती संघटनेचे प्रदेश सरचिटणीस बाळासाहेब शिरसट यांनी उपोषणाला पाठींबा दिला.