Mon, Jul 22, 2019 14:20होमपेज › Satara › जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत धरणात चांगला पाणीसाठा

जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत धरणात चांगला पाणीसाठा

Published On: Aug 13 2018 1:22AM | Last Updated: Aug 12 2018 10:55PMसातारा : प्रतिनिधी

सातारा जिल्ह्यातील धरणात  गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठा समाधानकारक असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. कोयना  व कण्हेर धरणात 91 टक्के पाणीसाठा आहे तर बाकीची धरणे 80 टक्क्याच्यावर भरली असल्याने  ही धरणे लवकरच भरण्याच्या मार्गावर आहेत.गेल्या दोन दिवसापासून पश्‍चिम भागात पावसाच्या  जोरदार सरी कोसळू लागल्या आहेत. त्यामुळे  नदी, नाले, ओढे खळाळून वाहत आहेत. धरणातील पाणी पातळीत वाढ झाल्याने पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न मिटणार आहे. 

कोयना धरणात आजचा उपयुक्त पाणीसाठा 91.75 असून 91.64टक्के धरणात पाणी  आहे गतवर्षी याच दिवशी 82.17  टक्के पाणी होते.धरणात 2580.74  द.ल.घ.मी पाण्याची आवक आहे.तर 2100 क्युसेक्स विसर्ग सोडण्यात येत आहे. धोम धरणात आजचा उपयुक्त पाणीसाठा 10.22 असून 87.43  टक्के धरणात पाणी  आहे गतवर्षी याच दिवशी 70.32 टक्के पाणी होते.धरणात 246.24  द.ल.घ.मी पाण्याची आवक आहे.

कण्हेर धरणात आजचा उपयुक्त पाणीसाठा 8.46 असून 88.22 टक्के धरणात पाणी  आहे गतवर्षी याच दिवशी 88.63 टक्के पाणी होते.धरणात 221.52 द.ल.घ.मी पाण्याची आवक आहे. धोम बलकवडी धरणात आजचा उपयुक्त पाणीसाठा 3.61 असून 91.16 टक्के धरणात पाणी  आहे गतवर्षी याच दिवशी 87.63 टक्के पाणी होते. धरणात 109.10 द.ल.घ.मी पाण्याची आवक आहे. उरमोडी धरणात आजचा उपयुक्त पाणीसाठा 8.43 असून 87.36 टक्के धरणात पाणी  आहे गतवर्षी याच दिवशी 89.53 टक्के पाणी होते.धरणात 163.22 द.ल.घ.मी पाण्याची आवक आहे.तारळी धरणात आजचा उपयुक्त पाणीसाठा 4.99 असून 85.45 टक्के धरणात पाणी  आहे गतवर्षी याच दिवशी 90.07  टक्के पाणी होते.धरणात 202.34  द.ल.घ.मी पाण्याची आवक आहे. नदीपात्रात 1590 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

मोरणा धरणात आजचा उपयुक्त पाणीसाठा 0.85  असून 65.38 टक्के धरणात पाणी  आहे गतवर्षी याच दिवशी 63.08  टक्के पाणी होते.धरणात 118.77 द.ल.घ.मी पाण्याची आवक आहे.तर सांडव्यावरून 1240 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे.उत्तरमांड धरणात आजचा उपयुक्त पाणीसाठा 0.58 असून 67.44 टक्के धरणात पाणी  आहे गतवर्षी याच दिवशी 67.44  टक्के पाणी होते.  नागेवाडी धरणात आजचा उपयुक्त पाणीसाठा0.10 असून 47.62 टक्के धरणात पाणी  आहे गतवर्षी याच दिवशी 42.86 टक्के पाणी होते. महू धरणात  आजचा उपयुक्त पाणीसाठा 0.11  असून 10.09 टक्के पाणी  आहे. गतवर्षी याच दिवशी 15.60 टक्के पाणी होते. हातेघर धरणात आजचा उपयुक्त पाणीसाठा 0.080 असून 32 टक्के धरणात पाणी  आहे गतवर्षी याच दिवशी 32 टक्के पाणी होते.