Wed, Jul 17, 2019 20:37होमपेज › Satara › आजीच्या अंत्यसंस्कारासाठी जाताना नातवाचा अपघाती मृत्यू 

आजीच्या अंत्यसंस्कारासाठी जाताना नातवाचा अपघाती मृत्यू 

Published On: Jun 18 2018 1:12AM | Last Updated: Jun 17 2018 11:24PMफलटण : प्रतिनिधी 

पुणे-पंढरपूर महामार्गावर राजुरी (ता. फलटण) येथे ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात कार व मोटारसायकलचा अपघात होऊन आजीच्या अंत्यसंस्कारासाठी निघालेला युवक जागीच ठार झाला, तर त्या मुलाची आई व पाहुणा हे दोघे  गंभीर जखमी झाले आहेत. 

याबाबत फलटण ग्रामीण पोलिसांनी दिलेली माहिती अशी,  रविवारी (दि. 17) सकाळी 10 वाजता दीप ढाब्याजवळ आपल्या आजीच्या अंत्यसंस्कारासाठी एकशिव (ता. माळशिरस) येथून गिरवी (ता. फलटण) येथे जात असताना शिवराज राजाराम चौधरी (वय 18), त्याची आई सौ. मनीषा राजाराम चौधरी आणि नातेवाईक साईराज रवींद्र रणवरे हे तिघे मोटारसायकल (क्र. एमएच 45 जे  8677 वरून निघाले होते. यावेळी फलटणकडून एक ट्रक पंढरपूर रोडने निघाला होता. याचवेळी कार (नं. एमएच 12- एनपी 0138) ने या ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकीला जोरात धडक दिली. या मध्ये शिवराज चौधरी (वय 18)  हा युवक जाग्यावरच ठार झाला तर त्याची आई सौ.मनीषा राजाराम चौधरी या गंभीर जखमी झाल्या असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. दुसरा नातेवाईक साईराज रवींद्र रणवरे हाही जखमी झाला असून या दोघांना फलटण येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कार चालक किसन गिरजू गोपाळे वय 76 रा.सुतारवाडी पाषाण जि. पुणे यांनाही अधिक उपचारासाठी खाजगी रुग्णालयात नेले असल्याची माहिती बरड पोलीस ठाण्याचे प्रभारी आर.आर. भोळ यांनी दिली. याबाबतची फिर्याद राजाराम महादेव चौधरी यांनी दिली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.