Thu, Mar 21, 2019 23:24
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › अपंगांना किमान ५ हजार पेन्शन द्या

अपंगांना किमान ५ हजार पेन्शन द्या

Published On: Dec 04 2017 1:34AM | Last Updated: Dec 03 2017 8:43PM

बुकमार्क करा

कराड : प्रतिनिधी 

दिव्यांग व्यक्तना कमीत कमी पाच हजार पेन्शन मिळणे आवश्यक आहे. मात्र सध्यस्थितीत ही रक्कम केवळ सहाशे रुपये आहे. त्यामुळेच यात वाढ करावी. तसेच विधवा, निराधार महिलांचा भत्ता व बेरोजगार भत्त्यामध्येही वाढ करावी, अशी मागणी करत मनसेकडून तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा मनसेच्या सातारा जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांनी दिला आहे

जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. विकास पवार यांच्यासह उपजिल्हाध्यक्ष महेश जगताप, सागर बर्गे, दादा शिंगण, नितीन महाडीक यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. अपंग दिनानिमित्त विविध उपक्रम राबवले जातात. अपंगाकरिता कायमस्वरूपी मिळणार्‍या पेन्शनमध्ये दरमहिन्याला वाढ होणे आवश्यक आहे. सध्याच्या महागाईच्या काळात कमीत कमी पाच हजार रूपये पेन्शन मिळणे आवश्यक आहे. 

अपंग व्यक्तींना दरवर्षी 21 हजार रूपयांचा उत्पन्नाचा मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे अनेक अपंग व्यक्ती पेन्शन योजनेपासून वंचित राहतात. हा अन्यायकारक नियम, अट रद्द करावी. त्याचबरोबर विधवा, निराधार तसेच सुशिक्षित बेरोजगार युवकांना अत्यल्प मानधन दिले जाते. यातही वाढ करावी, अशी मागणी मनसेच्या पदाधिकार्‍यांनी निवेदनाद्वारे केली आहे.