Wed, Jan 16, 2019 15:40होमपेज › Satara › वडिलांच्या मित्राकडून मुलीवर बलात्कार

वडिलांच्या मित्राकडून मुलीवर बलात्कार

Published On: Feb 07 2018 1:35AM | Last Updated: Feb 06 2018 10:12PMसातारा : प्रतिनिधी

वडिलांच्या मित्रानेच युवतीवर 2014 पासून वेळोवेळी जिवे मारण्याची धमकी देऊन बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात सुरेश (रा. कोरेगाव पूर्ण नाव, वय माहीत नाही) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पीडित मुलीचे आई, वडील कामाला गेल्यानंतर संशयित घरी जात होता. दरम्यान, पीडित मुलगी गर्भवती असून या घटनेने खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पीडित मुलगी 18 वर्षांची असून तिनेच सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.  पीडित मुलगी ही सातारा शहरालगत तिच्या आई, वडिलांसोबत वास्तव्य करत आहे. तिचे वडील व संशयित सुरेश हे मित्र आहेत. संशयित हा 2014 मध्ये घरी जेवणासाठी आला होता. त्यावेळी तो दारूही पिला होता. दुसर्‍या दिवशी संशयित कोणी नसताना घरी गेला व मुलीवर अत्याचार केले. अत्याचार केल्यानंतर याबाबत कुठेही वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. घाबरलेल्या युवतीने वडिलांना त्याबाबतची माहिती दिली; मात्र वडिलांनीही याबाबत वाच्यता न करण्यास बजावले.

दरम्यान, काही कालावधी गेल्यानंतर पुन्हा संशयिताने घरी जाऊन मुलीवर अत्याचार केले. वारंवार हा प्रकार होत असताना मुलीने घरी वडिलांना माहिती दिली; मात्र त्यांनी बदनामी होईल, या भीतीने कुठेही वाच्यता न करण्यास बजावले. त्यातूनच ती गर्भवती राहिली. 

यावेळी मुलीच्या वडिलांनी मुलीला व तिच्या आईला घरातून निघून जाण्यास सांगितले. त्यामुळे मुलगी व तिची आई रेल्वेने सांगली येथे गेले होते.  सुमारे चार दिवस राहिल्यानंतर पुन्हा ते सातारा येथे आले. यावेळी शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन घडलेल्या घटनेबाबत तक्रार दिली.