Mon, Mar 25, 2019 17:44होमपेज › Satara › दहावीत नापास झाल्याने मुलीची आत्महत्या

दहावीत नापास झाल्याने मुलीची आत्महत्या

Published On: Jun 09 2018 8:47PM | Last Updated: Jun 09 2018 8:47PMमहाबळेश्‍वर : वार्ताहर

इयत्ता दहावीमध्ये नापास झाल्याच्या नैराश्यातून महाबळेश्‍वर परिसरात असणार्‍या रांजणवाडी येथील अनिता बाबुराव शिंदे (वय 15) या मुलीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. 

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मार्च 2018 मध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीची परिक्षा घेण्यात आली. या परिक्षेचा निकाल शुक्रवारी दुपारी ऑनलाईन जाहीर झाला. अनितानेही आपला निकाल ऑनलाईन पाहिला होता. मात्र, अनिता १० वी नापास झाली होती. त्यामुळे शुक्रवारपासूनच ती शांत शांत होती. याबाबत तिच्या आई वडीलांनी तिची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, अनिताचे नैराश्य इतके वाढले की यामधून तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. 

शनिवारी दुपारी आई वडील घरात नसताना तिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. अनिता महाबळेश्‍वर शहरातील माखरीया हायस्कूल येथे शिकत होती. अनिता ही घरात सर्वात थोरली होती. तिच्या मागे एक बहिण व भाऊ आहे. या घटनेची  माहिती पोलिसांना उशीरा मिळाली. त्यानुसार रात्री 7 च्या दरम्यान पोलिस घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला आहे.