Thu, Mar 21, 2019 23:24
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › गॅसचा काळाबाजार; दोघाजणांना अटक

गॅसचा काळाबाजार; दोघाजणांना अटक

Published On: Dec 22 2017 1:29AM | Last Updated: Dec 21 2017 11:30PM

बुकमार्क करा

सावली : वार्ताहर 

मोरघर, ता. जावली येथे मेरूलिंग-मोरघर रस्त्यावर सातार्‍यातील एका गॅस एजन्सी यांच्या गॅस वितरण करणार्‍या गाडीतील भरलेल्या सिलिंडरमधून रिकाम्या सिलिंडरमध्ये गॅस भरून काळाबाजार करणार्‍या चालक शेखर सुरेश माने व क्‍लीनर नितीन सुरेश माने दोघेही रा. शिवथर या दोघांना मेढा पोलिसांनी गुरुवारी दुपारी अटक केली. 

याबाबत मिळालेली माहिती अशी, मेरूलिंग घाटामध्ये गुरुवारी पोलिस पेट्रोलिंग करत होते. यावेळी दुपारी 4 च्या सुमारास मेरूलिंग-मोरघर रस्त्यावर रस्त्याच्या कडेला गॅस वितरण करणारी गाडी (एम.एच. 11. बीएल.6543)  निदर्शनास आली. या गाडीतील 5 ते 6 सिलिंडर बाहेर काढल्याचे आढळून आले. यावरून पोलिसांना संशय आल्यानंतर पोलिसांनी चौकशी केली. त्यावेळी भरलेल्या सिलिंडरमधून मोकळ्या सिलिंडरमध्ये गॅस भरत असल्याचे दोघांनी सांगितले. त्यामुळे गॅसचा काळाबाजार केल्याप्रकरणी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले पोलिसांनी या प्रकारची माहिती पुरवठा विभागाला दिल्यानंतर पुरवठा अधिकारी विजय काळे व निरीक्षक हेमंत धुमाळ यांनी घटनेचा पंचनामा केला. 

सपोनि जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईत सहाय्यक फौजदार राजेंद्र कदम, वाघ, हवालदार सूर्यकांत शिंदे, पो.कॉ. अमोल पवार, अभिजीत सुतार, पो.ना. उद्धव शिंदे यांनी सहभाग घेतला.