Wed, Apr 24, 2019 16:32होमपेज › Satara › सातारा : मटका व्यवसायिकांचा राडा; तोडफोड आणि मालकाला मारहाण

सातारा : मटका व्यवसायिकांचा हॉटेलमध्ये राडा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

मटका व्यवसायाची माहिती पोलिसांना देत असल्याच्या कारणावरुन रविवारी सायंकाळी आठ जणांनी एमआयडीसीतील कल्याण रिसॉर्ट मध्ये घुसून तोडफोड केली. तोडफोड करत असतानाच टोळक्याने हॉटेल मॅनेजर प्रकाश भोईटे यांना मारहाण केली असून याप्रकरणी अमर बनसोडेसह आठ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, मटका व्यवसायिकांनी राडा केल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, अजंठा चौकातील हॉटेल प्रीतीच्या पाठीमागे सुरू असणार्‍या मटका अड्यावर चार दिवसांपूर्वी पोलिसांनी छापा टाकून त्याठिकाणी असणार्‍या साहित्याची तोडफोड केली होती. याप्रकरणी अमर बनसोडे, मनोज बनसोडेसह इतरांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्याठिकाणी सुरु असणार्‍या अड्याची माहिती कल्याण रिसॉर्ट मधून पोलिसांना देण्यात येत असल्याचा संशय बनसोडे व इतरांना होता. याच संशयावरुन रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास अमर बनसोडे मनोज बनसोडे (रा. वनवासवाडी) हे इतर साथीदारांसमवेत कल्याण रिसॉर्टमध्ये गेले.

संशयितांनी हॉटेलच्या काउंटरवर असणार्‍या प्रकाश भोईटे यांना उद्देशून शिविगाळ करत ‘तुम्ही आमच्या धंद्याची माहिती पोलिसांना देता, त्यामुळे कारवाई होते, आमच्या अड्डा तोडला आहे’, असे म्हणत तोडफोड करण्यास सुरुवात केली. तोडफोड करतानाच त्यांनी भोईटे यांना मारहाण केली. यावेळी त्याठिकाणी मयुर आनंदराव कणसे (रा. संभाजीनगर) हे आले व त्यांनी भांडणे सोडवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, संशयितांनी मारहाण करत हॉटेलची तोडफोड केली असून मयुर कणसे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

Satara : Gamlar, Beaten, Hotel, Satara, Crime, 


  •